Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradosh Vrat: नोव्हेंबर महिन्यातील पहिला प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

देवांचे देव महादेव यांना समर्पित असलेले व्रत म्हणजेच प्रदोष व्रत. महिन्यातून दोनदा येते. यावेळी नोव्हेंबर महिन्यात सोमवारी पहिले प्रदोष व्रत आहे. सोम प्रदोष व्रत कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 25, 2025 | 03:44 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

त्रयोदशी तिथीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, महादेव आणि पार्वतीची पूजा केल्यास सर्व प्रकारचे आजार दूर होतात. जीवनात सुख आणि समृद्धी येते. ज्यावेळी ही तिथी सोमवारी येते त्यावेळी या व्रताला सोम प्रदोष व्रत असे म्हटले जाते. नोव्हेंबर महिन्यातील पहिले सोम प्रदोष व्रत सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

सोम प्रदोष व्रत कधी आहे

सोम प्रदोष व्रताची सुरुवात सोमवार 3 नोव्हेंबरपासून होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कार्तिक शुक्ल त्रयोदशी तिथीची सुरुवात देखील 3 नोव्हेंबर सकाळी 5:07 वाजता होईल आणि कार्तिक शुक्ल त्रयोदशी तिथीची समाप्ती 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 2:05 वाजता होईल. प्रदोष व्रत पूजा प्रदोष काळात केली जाते म्हणजे संध्याकाळच्या वेळी ही पूजा केली जाते. त्रयोदशी तिथी प्रदोष काळ सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी आहे.

Vinayak Chaturthi: ग्रहांच्या अडथळ्यांपासून आणि कर्जापासून सुटका हवी असल्यास विनायक चतुर्थीला करा हे उपाय

सोम प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त

प्रदोष व्रतामध्ये सूर्यास्तानंतर आणि रात्री होण्यापूर्वी महादेवाची पूजा केली जाते, या काळाला प्रदोष काळ म्हणतात. या काळात पूजा केल्याने सर्वोत्तम फळ मिळते. प्रदोष काळात पूजेसाठी शुभ मुहू्र्त संध्याकाळी 5.34 ते 8.11 वाजेपर्यंत असेल. एकूण कालावधी 2 तास 36 मिनिटे राहील.

प्रदोष व्रताला पूजा करण्याची पद्धत

प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व आवरुन आंघोळ झाल्यानंतर चांगले कपडे परिधान करावे. त्यानंतर ॐ नमः शिवाय या मंत्रांचा जप करुन उपवास करावा. दिवसभर महादेवाचे स्मरण करावे. प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा स्नान करा. भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मूर्ती किंवा शिवलिंग पूजेसाठी स्वच्छ ठिकाणी ठेवा. त्यानंतर, प्रथम गंगाजल, दूध, दही, मध, तूप आणि उसाचा रस वापरून शिवलिंगावर रुद्राभिषेक करा. भगवान शिवाला चंदनाचा लेप लावा आणि त्यांना बेलाची पाने, भांग, धतूरा, आक फुले आणि शमीची पाने अर्पण करा.

Budh Gochar: बुध ग्रह करणार मंगळ राशीमध्ये प्रवेश, या राशीच्या लोकांची करिअर आणि व्यवसायात होईल प्रगती

देवी पार्वतीला सोळा श्रृंगार अर्पण करा. हंगामी फळे, मिठाई आणि खीर अर्पण करा. आसनावर बसून रुद्राक्ष माळेचा वापर करून “ॐ नमः शिवाय” हा मंत्र किमान 108 वेळा उच्चार करा. त्यानंतर सोम प्रदोष व्रताची कथा वाचा किंवा ऐका. त्यानंतर महादेवांची आरती करावी. पूजा झाल्यानंतर सर्वामध्ये हा प्रसाद वाटावा.

प्रदोष व्रताचे महत्त्व

रोगांपासून सुटका आणि चंद्रदोष दूर होणे

सोमवारचा दिवस महादेव आणि चंद्र या दोघांनाही समर्पित आहे. सोम प्रदोष व्रत केल्याने चंद्राच्या त्रासांपासून मुक्तता मिळते आणि आरोग्य चांगले राहते. दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी हे व्रत करणे खूप फायदेशीर ठरते.

मनातील इच्छा पूर्ण होणे

या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास महादेव आणि पार्वती लवकर प्रसन्न होतात. तसेच भक्तांच्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात.

सुख आणि वैवाहिक जीवन

प्रदोष व्रताचे योग्यरित्या पालन केल्यास घरात शांती आणि आनंद येतो आणि वैवाहिक जीवन सुसंवादी राहते. अविवाहित मुलीनी हे व्रत करणे फायदेशीर असल्याचे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pradosh vrat month of november som pradosh vrat shubh muhurt mode of worship and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
2

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
3

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.