
फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार पुत्रदा एकादशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. यावर्षी पुत्रदा एकादशी मंगळवार, 30 डिसेंबर रोजी येते. ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी आहे. मात्र ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या या एकादशीला खूप महत्त्व आहे. आनंद आणि सौभाग्याचा ग्रह शुक्र 30 डिसेंबर रोजी रात्री 10.5 वाजता पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धनाची देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जात असल्याने, एकादशीला शुक्राचे भ्रमण काही राशींसाठी शुभ राहील. त्याच्या प्रभावामुळे व्यवसायात फायदा होणे, करिअर यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. पुत्रदा एकादशीला कोणत्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होणार आहे. कुटुंबामध्ये पार्टीचे आयोजन केले जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगारामध्ये अपेक्षित वाढ होऊ शकते. व्यावसायिकांना उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. आर्थिक फायदा होऊ शकतो. एकादशीच्या दिवशी विष्णूंना हरभऱ्याची डाळ अर्पण केल्याने तुमच्या कारकिर्दीत सकारात्मक परिणाम होताना दिसून येतील. या काळात तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी होऊ शकतात.
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतील. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. सामाजिक आदर मिळेल आणि त्यांना अनेक सकारात्मक परिणाम दिसतील. तुमच्या करिअरशी संबंधित लांब पल्ल्याचा प्रवास शक्य आहे. त्याचसोबत तुमचे कौतुक केले जाईल. व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. एकादशीला पिवळ्या वस्तूचे दान करणे फायदेशीर ठरु शकते.
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक असणार आहे. या काळात तुमची प्रगती होईल. तसेच तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. त्याचसोबत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारलेली राहील. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल राहील. बऱ्याच काळापासून ज्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात त्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. एकादशीच्या दिवशी विष्णूंना केशराची खीर अर्पण करा. त्यात तुळशीची पाने अवश्य घाला. त्यामुळे तुम्हाला सुख समृद्धी मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पुत्रदा एकादशी ही पौष महिन्यात येणारी एकादशी आहे. 2025 मध्ये वर्षाच्या शेवटच्या एकादशीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाईल. ही एकादशी संतानसुख, सौख्य आणि समृद्धीसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते.
Ans: या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने संतानप्राप्ती, कुटुंबातील सुख-शांती आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते अशी श्रद्धा आहे.
Ans: अन्नदान, वस्त्रदान, धान्य किंवा पिवळ्या वस्तूंचे दान केल्यास पुण्यप्राप्ती होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते.