राहू मंगळ षडाष्टक योगाने काय होणार (फोटो सौजन्य - iStock)
ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि मंगळाची सध्याची स्थिती धोकादायक षडाष्टक योग निर्माण करत आहे. खरंतर, १८ मे रोजी राहू कुंभ राशीत प्रवेश करतो. तर मंगळ ३ एप्रिलपासून कर्क राशीत आहे. यामुळे राहू आणि मंगळ यांच्यामध्ये षडाष्टक योग तयार होत आहे. सहाव्या किंवा आठव्या घरात दोन ग्रहांच्या उपस्थितीमुळे हा योग तयार होतो. सध्या राहू आणि मंगळ यांच्यामध्येही अशीच परिस्थिती आहे. ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
राहू आणि मंगळ या षडाष्टक योगामुळे नक्की काय घडणार आहे आणि नक्की हा योग काय असतो याबाबत आपण अधिक माहिती या लेखाद्वारे घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
षडाष्टक योग म्हणजे काय?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात असतात तेव्हा या प्रकारचे संयोजन तयार होते. याशिवाय, जेव्हा दोन ग्रहांमध्ये १५० अंशांचा फरक असतो तेव्हा देखील असे संयोजन तयार होते. या षडाष्टक योगामुळे अनेक प्रकारच्या आव्हानांना आणि समस्यांना तोंड द्यावे लागते. राहू आणि मंगळ हे दोन्ही ग्रह पापी आणि भयंकर मानले जातात. अशा परिस्थितीत, दोन भयंकर ग्रहांची युती या योगाला अधिक शक्तिशाली बनवत आहे. या षडाष्टक योगाचा सामाजिक संबंध, आर्थिक निर्णय आणि मानसिक शांतीवरही परिणाम होईल
Today Horoscope: कालाष्टमीचा दिवस या राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
7 जूनपर्यंत प्रभावी
7 जूनपर्यंत मंगळ कर्क राशीत राहील. त्यामुळे मंगळ-राहू यांनी तयार केलेला षडाष्टक योग 7 जूनपर्यंत प्रभावी राहील. ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि राहूमुळे तयार झालेला षडाष्टक योग खूप धोकादायक मानला जातो. हे केवळ काही राशीच्या लोकांसाठी धोकादायक नाही तर देश आणि जगावरही भयानक परिणाम करू शकतो असे सांगण्यात आले आहे. याचे परिणाम दिसायला आधीच सुरूवात झाली असल्याचेही ज्योतिषांनी सांगितले.
जगावर युद्ध, तुफानाचे संकट
सूर्यमालेतील ग्रहांची स्थिती देश आणि जगाच्या राजकारण, शांतता व्यवस्था, आपत्ती इत्यादींवरदेखील परिणाम करते. सध्या तयार झालेला षडाष्टक योग देश आणि जगात वादळ, पूर, भूकंप, आग इत्यादी आपत्ती आणि घटना घडवू शकतो. यामुळे जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. याशिवाय, ते युद्धालाही भडकवू शकते. पहलगाम हल्ल्यानंतर सुरू झालेला भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सध्या तरी संपला असला तरी, ७ जूनपूर्वी तो पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.
Budh Gochar: या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ, बुध करणार शुक्र राशीत प्रवेश
कोणत्या राशींवर परिणाम
ज्योतिषशास्त्रानुसार, राहू-मंगळ षडाष्टक योग सिंह, धनु आणि मीन राशींवर वाईट परिणाम करू शकतो. यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक आव्हाने येऊ शकतात, म्हणून या लोकांनी ७ जूनपर्यंत सतर्क राहावे. या राशीच्या व्यक्तींनी वागणूक आणि अन्य गोष्टीतही सावधानता बाळगावी जेणेकरून तुम्हाला या षडाष्टक योगाचा अधिक फटका बसणार नाही.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.