
फोटो सौजन्य- pinterest
राहूचा स्वभाव अप्रत्याशित आहे म्हणूनच त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसून येतो. या संक्रमणादरम्यान, काही राशींना अचानक आर्थिक लाभ, नवीन संधी, अनपेक्षित यश आणि त्यांच्या जीवनात मोठे बदल अनुभवता येतील. ज्योतिषशास्त्रानुसार, राहूच्या या संक्रमणाचे विश्लेषण प्रामुख्याने चंद्र राशीच्या आधारे केले जाते. यावरुन हे लक्षात येते की, या काळात कोणत्या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या
कर्क राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण आठव्या घरामध्ये होणार आहे. याचा संबंध लपलेली माहिती, अचानक होणारे बदल, परिवर्तन आणि जीवनाच्या खोलीशी संबंधित आहे. यामुळे तुमच्या जीवनात अपेक्षित बदल होऊ शकतात. अचानक नोकरी किंवा स्थान बदलणे, करिअरमध्ये मोठा बदल किंवा जीवनशैलीत मोठा बदल शक्य आहे. या काळात आध्यात्मिक आणि मानसिक समज विकसित करण्याची संधी मिळेल. आत्मनिरीक्षण आणि मानसिक परिवर्तनासाठी हा काळ अनुकूल आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी आत्म-विकास आणि जीवनात गहन बदल हा काळ दर्शवितो.
तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण पाचव्या घरामध्ये होत आहे. शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. पाचवे घर शिक्षण, मुले, सर्जनशीलता, बुद्धिमत्ता, प्रेम संबंध आणि भूतकाळातील कर्मांशी संबंधित आहे. कला, माध्यम, साहित्य, शिक्षण, आयटी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात असलेल्या लोकांची या काळात प्रगती होऊ शकते. हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणारा राहील. सर्जनशील, बौद्धिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण दुसऱ्या घरात होत आहे. ज्याचा संबंध धन, वाणी, कुटुंब, वडिलोपार्जित मालमत्ता आणि संचित संपत्तीशी आहे. राहूच्या स्थितीमुळे अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि जुन्या मालमत्तेचे वाद सहजपणे सोडवले जाऊ शकतात. या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकते. संभाषण, संपर्क आणि संवादातून तुम्हाला फायदा होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: राहूने शतभिषा नक्षत्रात 23 नोव्हेंबर रोजी प्रवेश केला आहे
Ans: या नक्षत्रात तो 2 ऑगस्ट 2026 पर्यंत राहणार आहे
Ans: कर्क, तूळ आणि मकर राशीच्या लोकांना फायदा होणार आहे