फोटो सौजन्य- pinterest
श्रावण पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तसेच भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. रक्षाबंधनानंतर राखीचे काय करावे आणि राखी किती दिवस असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. रक्षाबंधनानंतर धार्मिक शास्त्रांनुसार राखी कधी काढावी आणि त्यासाठी काय नियम आहेत ते जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, आज शनिवार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या दिवशी बहीण आपल्या भावांना राखी बांधेल. पण ही राखी कधी काढावी. त्यासाठी कोणते धार्मिक नियम आहेत त्या नियमांचे पालन न केल्यास कोणत्या नकारात्मक समस्यांचा सामना करावा लागू शकतो हे जाणून घेऊया.
धार्मिक शास्त्रात म्हटल्यानुसार, रक्षाबंधनानंतर दसऱ्यापर्यंत राखी ठेवण्याचा नियम आहे. दसऱ्याचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि राखी प्रत्येक वाईटापासून संरक्षणदेखील करते. राखी दसऱ्याच्या दहाव्या दिवशीच काढावी. जन्माष्टमीनंतर राखी काढल्यानंतर ती एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवावी किंवा झाडाथाली, पाण्यात विसर्जित करावी.
रक्षाबंधनानंतर भावाने बांधलेली राखी किमान जन्माष्टमीपर्यंत ठेवून त्यानंतर काढावी. या वर्षी जन्माष्टमीचा उत्सव शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी आहे, तोपर्यंत राखी ठेवणे शुभ आहे. तुम्ही जन्माष्टमीनंतरच राखी काढू शकता.
रक्षाबंधनानंतर राखी काढण्याच्या वेळी सकाळी लवकर उठून राखी काढावी. दोरा तोडू नका तर त्या राखीची गाठ सोडा आणि ती काढा. त्यानंतर राखी काढून इकडे तिकडे फेकू नका, तर ती देव्हारा किंवा नदी किंवा तलावाच्या पाण्यात विसर्जित करा. त्यामुळेच तुम्हाला शुभ फळे मिळतील. मात्र तुमच्या जवळपास नदी नसल्यास राखी झाडाखाली किंवा पवित्र ठिकाणी ठेवावी. जर राखी तुटली किंवा घाणेरडी झाली तर ती तुळशीच्या झाडाजवळ ठेवून त्याची प्रार्थना करावी.
ज्योतिष आणि पंचांगानुसार, 16 दिवस मनगटावर राखी बांधून ठेवणे खूप फायदेशीर मानल जाते. या कालावधीला ‘पंधरा दिवसांचा उत्सव’ म्हणतात, ज्यामध्ये पौर्णिमेपासून पुढील 15 दिवसांचा समावेश असतो. 16व्या दिवशी राखी काढून नदी किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी. असे केल्याने भावाचे दीर्घायुष्य आणि यश वाढते, असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)