फोटो सौजन्य- pinterest
आजचा शनिवारचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आजचा शनिवारचा ग्रह मंगळ आहे. त्यामुळे सर्व मूलांकाच्या लोकांवर मंगळाचा प्रभाव राहील. आजचा शनिवारचा स्वामी ग्रह शनि आहे. शनि ग्रहाचा अंक 8 असतो. आज मूलांक 8 असणाऱ्याना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर मूलांक 9 असणाऱ्याचा दिवस चांगला राहील. नशिबाची साथ मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसात तुम्हाला यश मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. समजात मान सन्मान वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुमचा तणाव वाढलेला राहू शकतो. आर्थिक समस्या उद्भवू शकतात. जर तुमचे पैसे अडकले असतील तर परत मिळू शकतात. कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कोणालाही सल्ला देताना विचार करावा नाहीतर त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध रहावे. कौटुंबिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला थोडी चिंता वाटू शकते. कुठेही जाताना सावध रहावे लागेल अन्यथा छोटीशी दुखापत होऊ शकते. घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते
मूलांक 5 असणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. रागावर नियंत्रण ठेवा. आज कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवू शकता. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक समस्या जाणवू शकतात.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी सांभाळून रहावे लागेल आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चढ उताराचा असू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या अन्यथा दुखापत होण्याची शक्यता. ज्या लोकांना रक्ताची संबंधित समस्या आहेत त्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील मात्र संध्याकाळी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्य एखाद्या गोष्टीवरून तुमच्यावर नाराज असू शकतात.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. खूप वेळेपासून तुम्ही धार्मिक कार्य करू इच्छित असाल तर त्याचा आता विचार करू शकता. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवायला हवे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)