
hanuman jayanti
शनिवार (Saturday) हा हनुमानजींचा (hanuman Puja On Saturday) म्हणजेच मारुतीचा दिवस आहे. अनेक हनुमान भक्त शनिवारी न चुकता हनुमानाचे दर्शन(Hanuman Darshan) घेतात. ज्यांचा शनी वक्री आहे किंवा ज्यांना साडेसाती आहे त्यांना हनुमानाची उपासना करण्यास सांगतात. परंतु हनुमानाची उपासना केल्याने शनीचा प्रभाव का कमी होते याचे नेमके कारण अनेकांना माहिती नाही. धार्मिक कथांनुसार शनिदेवाला रावणाने लंकेत कैद केले होते. हनुमानजींनीच शनिदेवला रावणाच्या बंधनातून मुक्त केले. तेव्हा शनिदेवाने हनुमानाला वचन दिले की माझा अशुभ परिणाम तुमच्या भक्तांवर कधी येणार नाही.
[read_also content=”‘जय भवानी जय शिवराय’, कलावंतानी सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना https://www.navarashtra.com/movies/emotions-expressed-by-the-artist-on-social-media-241615.html”]
शनिवारी मारुतीच्या पूजेस विशेष महत्त्व आहे.धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी हनुमान आणि शनिदेव यांना समर्पित आहे. या दिवशी शनिदेव यांच्यासमवेत व्यक्तीने मारुतीची पूजा करावी.