Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishi Panchami 2025: ऋषी पंचमीची पूजा महिलांसाठी का असते खास, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ऋषीपंचमी हा सण साजरा केला जातो. ऋषीपंचमी नावावरूनच हा दिवस ऋषीमुनींशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. हा दिवस गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 24, 2025 | 11:39 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाचा पाचवा दिवस ज्याला ऋषीपंचमी असे म्हटले जाते. यावेळी हा सण गुरुवार, 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. हा सण गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. मान्यतेनुसार, गणपतीची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, तर ऋषीपंचमीच्या दिवशी सप्तर्षींची पूजा केल्याने ज्ञान, संस्कृती आणि आत्मशुद्धीचा आशीर्वाद मिळतो. जी व्यक्ती या दिवशी पूजा आणि उपवास करतात त्यांना जीवनामध्ये आनंद, शांती आणि समृद्धी लाभते, असे म्हटले जाते.

ऋषीपंचमी शुभ मुहूर्त

ऋषीपंचमीच्या सणाच्या वेळी गंगेत स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. यावेळी ऋषीपंचमीच्या पूजेसाठी मुहूर्त गुरुवार, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11.5 ते दुपारी 1.39 पर्यंत राहील. यावेळी सप्तऋषींची पूजा करणे खूप शुभ मानले जाते.

Budh Gochar: बुध ग्रह करणार शुक्राच्या घरात संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

ऋषीपंचमीची पूजा कशी करायची

ऋषीपंचमीच्या दिवशी महिला सप्त ऋषींची पूजा करतात यावेळी ऋषी कश्यप, ऋषी अत्री, ऋषी भारद्वाज, ऋषी वशिष्ठ, ऋषी गौतम, ऋषी जमदग्नी आणि ऋषी विश्वामित्र. या सात ऋषींना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या शक्तींचे प्रतिनिधित्व करणारे दैवी प्राणी मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी त्यांची पूजा केल्याने पापे दूर होतात आणि जीवनात शांती आणि समृद्धी येते.

का साजरी केली जाते ऋषीपंचमी

ऋषीपंचमी हा सण किंवा उत्सव म्हणून साजरा केला जात नाही तर तो व्रत आणि शुद्धीकरणाचा विधी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिला व्रत पाळून अज्ञात चुकांसाठी क्षमा मागतात. तसेच आध्यात्मिक शुद्धीकरण आणि मोक्षासाठी देखील प्रार्थना केली जाते. या दिवशी सप्तर्षी, कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, वशिष्ठ, जमदग्नी आणि गौतम यांची पूजा करण्याची प्रथा आहे.

ऋषीपंचमीच्या व्रताचे महत्त्व

ऋषीपंचमीचा संबंध सप्तर्षींशी आहे. ज्याला हिंदू धर्मामध्ये ज्ञान आणि तपस्येचे प्रतीक मानले जाते. त्यासोबतच वेद, आयुर्वेद, ज्योतिष आणि संस्कृत यासारख्या ज्ञानाच्या शाखा त्यांच्या माध्यमातून विकसित झाल्या. असे मानले जाते की, या दिवशी जो कोणी पूजा करतो त्याला जीवनामध्ये धन, बुद्धी, संतती आणि आनंद मिळते.

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाची ‘ही’ आहेत 32 रुपे, त्याच्या प्रत्येक रुपामागे दडले आहे चमत्कारी रहस्य

ऋषी पंचमीला या गोष्टींचे करा दान

ऋषीपंचमीला सप्तर्षींची पूजा झाल्यानंतर या गोष्टींचे दान करावे. यामुळे व्रताचे शुभ फळ मिळते, अशी मान्यता आहे. या दिवशी ब्राह्मणाला केळी, तूप, साखर इत्यादी दान करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Rishi panchami 2025 time and importance of puja special fast for women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 11:39 AM

Topics:  

  • dharm
  • Ganesh Chaturthi 2025
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar: बुध ग्रह करणार शुक्राच्या घरात संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा
1

Budh Gochar: बुध ग्रह करणार शुक्राच्या घरात संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Ganesh Chaturthi 2025 : हटक्या पदार्थाने करा बाप्पाला खुश; यंदा प्रसादासाठी बनवा सुगंधित आणि गोड चवीने भरलेले ‘पान मोदक’
2

Ganesh Chaturthi 2025 : हटक्या पदार्थाने करा बाप्पाला खुश; यंदा प्रसादासाठी बनवा सुगंधित आणि गोड चवीने भरलेले ‘पान मोदक’

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाची ‘ही’ आहेत 32 रुपे, त्याच्या प्रत्येक रुपामागे दडले आहे चमत्कारी रहस्य
3

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाची ‘ही’ आहेत 32 रुपे, त्याच्या प्रत्येक रुपामागे दडले आहे चमत्कारी रहस्य

Zodiac Sign: शिवयोगामुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल भरपूर संपत्ती
4

Zodiac Sign: शिवयोगामुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल भरपूर संपत्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.