फोटो सौजन्य- pinterest
दरवर्षी कार्तिक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तसेच भक्त या दिवशी उपवास देखील करतात आणि चंद्रोद्याच्या वेळी सोडतात. हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भक्तिभावाने बाप्पाची पूजा केल्याने भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. वक्रतुंड संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तसेच भक्त या दिवशी उपवास देखील करतात आणि चंद्रोद्याच्या वेळी सोडतात. मात्र याच दिवशी उत्तर भारतामध्ये विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि कल्याणासाठी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात. काही अविवाहित महिला देखील इच्छित जीवनसाथी मिळवण्याच्या आशेने हे व्रत करतात.
पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात गुरुवार, 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10.54 वाजता सुरू होईल आणि शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.38 वाजता संपेल. यावेळी संकष्टी चतुर्थी शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी आहे. यावेळी चंद्रोद्य रात्री 8.13 वाजता होणार आहे.
या दिवशी सूर्योदय – सकाळी 6.19 वाजता होईल. तर सूर्यास्त संध्याकाळी 5.57 वाजता होईल. चंद्रोदय सकाळी 8.58 वाजता
चंद्रोदय – रात्री 8.13 वाजता होईल. या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 4:40 ते 5:30 असेल. विजया मुहूर्त दुपारी 2:04 ते दुपारी 2:51 पर्यंत असेल. गोधुली मुहूर्त – संध्याकाळी 5:57 ते संध्याकाळी 6:22 पर्यंत आणि निशिता मुहूर्त सकाळी 11:43 ते दुपारी 12:33 पर्यंत असेल.
कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला सकाळी लवकर उठावे. सर्व आवरुन झाल्यानंतर गणपती बाप्पाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. शक्यतो पूजा करताना पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करावे. त्यानंतर पंचोपचार करून गणपतीची पूजा करा. यावेळी, गणपतीला पिवळी फुले, फळे, मोदक आणि दुर्वा घास अर्पण करा. शेवटी, आरती करुन घ्यावी. दिवसभर उपवास करा आणि संध्याकाळी आरती करा. पूजा आणि विधी केल्यानंतर रात्री उपवास सोडा.
गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. संकष्टी चतुर्थीला हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, असे म्हटले जाते. गणपती बाप्पाला सद्गुण, बुद्धी आणि समजूतदारपणाचे प्रतीक मानले जाते. त्याची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतात आणि बुद्धिमत्ता विकसित होते. या दिवशी उपवास केल्याने कुटुंबामध्ये संपत्ती, समृद्धी, आनंद, शांती आणि सौभाग्य आणते. संकष्टी चतुर्थीचा उपवास करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. चंद्रोद्यानंतर उपवास सोडणे फायदेशीर मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)