
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मग्रंथांमध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे. ही तिथी विघ्न दूर करणाऱ्या गणपती बाप्पाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. यावेळी भक्त उपवास करुन चंद्रोद्याची वेळी सात्विक भोजन करुन उपवास सोडतात. कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी बाप्पाची विधिवत पूजा केली जाते.
मान्यतेनुसार, या दिवशी जी व्यक्ती उपवास करते त्या व्यक्तीला जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यास मदत होते. णाधिप संकष्टी चतुर्थीच्या पूजेदरम्यान गणपती बाप्पाला त्याच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि आयुष्यातील सर्व दुःखांपासून मुक्त होतात. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या
पंचांगानुसार, गणाधिप संकष्टी चतुर्थी तिथीची सुरुवात शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:32 वाजता होणार आहे आणि 9 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.25 वाजता या तिथीची समाप्ती होईल. यावेळी संकष्टी चतुर्थी शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी चंद्रोद्य रात्री 8 वाजून 1 मिनिटांनी असेल.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त सकाळी 4.53 ते 5.46 पर्यंत आहे. अभिजित मुहूर्त सकाळी 11.43 ते दुपारी 12.26 पर्यंत असेल. पूजेसाठी मुहूर्त सकाळी 8 ते 9.21 पर्यंत असेल. दुसरा मुहूर्त दुपारी 12.5 ते 4.9 पर्यंत आहे. चतुर्थीच्या दिवशी निशिता मुहूर्त रात्री 11.39 ते 12.31 पर्यंत असते.
गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात. मोदक अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि ते बुद्धी आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात, असे मानले जाते.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्यात. त्यासोबत गूळ देखील अर्पण करावे. यामुळे धन आणि समृद्धी वाढते.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला केळी अर्पण करावी. कारण गणपती बाप्पाला केळी खूप आवडतात. देवतेला केळी अर्पण केल्याने कामात यश मिळते.
गणपती बाप्पाला नारळ देखील अर्पण करावे. नारळ अर्पण केल्याने त्रास दूर होण्यास मदत होते.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जी व्यक्ती भक्तिभावाने उपवास करते त्या व्यक्तीच्या सर्व समस्या आणि त्रास दूर होतात. स्कंद पुराणामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत योग्य विधींसह केल्याने जीवनात आनंद आणि शांती येते. त्यासोबतच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याबरोबरच काम यशस्वी होते आणि करिअरमध्ये प्रगती देखील होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे.
Ans: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा करावी
Ans: संकष्टी चतुर्थीला चंद्रोद्याच्या वेळी उपवास सोडावा