फोटो सौजन्य- istock
हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्यातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पाला समर्पित आहे. कार्तिक महिन्यातील चतुर्थी तिथीला गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. या व्रताच्या दिवशी भक्त उपवास करतात. हे व्रत दुःख आणि संकटे दूर करणारे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी योग्य विधींनी बाप्पाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्यांना सुख समृद्धी मिळते. नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी कधी आहे, मुहूर्त आणि चंद्रोद्याची वेळ जाणून घ्या
गणाधिप संकष्टी चतुर्थी ही कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाणार आहे. यावेळी शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी उपवास करणे आणि चंद्राची प्रार्थना करण्याला विशेष महत्त्व आहे.
चतुर्थी तिथीची सुरुवात शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.32 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार, 9 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.25 वाजता होणार आहे. यावेळी संकष्टी चतुर्थी शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी चंद्रोद्य रात्री 8 वाजून 1 मिनिटांनी आहे.
गणाधिप संकष्टी चतुर्थीला शिव आणि सिद्ध योग तयार होत आहे. भद्रावास आणि शिववास योगदेखील या दिवशी तयार होत आहे. या योगांमध्ये गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचसोबत आनंद आणि सुख समृद्धी देखील वाढते. जर तुम्हाला गणपती बाप्पाचे आशीर्वाद हवे असल्यास गणाधिप संकष्टी चतुर्थीला या योगांमध्ये एकदंताची पूजा करा.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर हातात पाणी घेऊन तांदूळ आणि फूल घ्या आणि व्रताचा संकल्प करा. नंतर चौरंगावर किंवा पाठावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. त्यावर रोळी, तांदूळ, दुर्वा, फूल, हार आणि चंदन अर्पण करा. त्यानंतर गणपती बाप्पाला मोदक आणि लाडू यांचा नैवेद्य दाखवा. त्यासोबतच गणेश चालीसाचे पठण करुन त्याची व्रत कथा ऐका. ॐ गं गणपतये नमः या मंत्रांचा जप करा. हा जप करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. चंद्रोद्याच्या वेळी पाणी, दूध आणि तांदूळ मिसळून अर्घ्य अर्पण करा. उपवास सोडण्याच्या वेळी सात्विक अन्नाचे सेवन करावे.
कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. संकष्टी म्हणजे “संकट दूर करणारी”. असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि समस्या दूर होतात. गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती वास करते. गणेशाला बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानले जाते. त्यांची पूजा केल्याने ज्ञान वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार, जे लोक या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करतात, त्यांचे चंद्रदोष शांत होतात आणि त्यांना मानसिक शांती मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






