फोटो सौजन्य- pinterest
रविवार, 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता बुध आणि शनिने एकमेकांपासून १५०° कोनीय स्थिती तयार केली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कोनीय स्थितीला बुध आणि शनीचा षडाष्टक योग म्हणतात. बुध-शनिची ही युती बहुतेक राशींच्या लोकांसाठी प्रतिकूल राहील. तर काही राशीच्या लोकांना या काळात सावधगिरी बाळगावी लागेल. षडाष्टक योगामध्ये कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे आणि कोणत्या गोष्टींचे दान करावे, उपाय जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रानुसार, पारंपरिक ज्योतिषशास्त्रात षडाष्टक योग सामान्यतः अशुभ मानला जातो कारण तो ग्रहांमधील उर्जेचे संतुलन बिघडवतो. ज्यामुळे मानसिक, शारीरिक किंवा भौतिक जीवनात संघर्ष, तणाव आणि अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यावेळी ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात असल्याने तो कुंडलीमध्ये सर्वात अशुभ असतो. या काळात काही उपाय करुन काही गोष्टींचे दान करणे खूप फायदेशीर ठरते.
मिथुन राशीच्या लोकांनी या काळात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. षडाष्टक योग तुमच्या विचारांवर आणि निर्णयांवर परिणाम करू शकतो. अवांछित वाद आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत अनियोजित खर्च किंवा अनपेक्षित अडथळे येऊ शकतात. आरोग्यात ताण, पचन समस्या किंवा डोकेदुखीच्या तक्रारी असू शकतात. या काळात तुम्ही ओम बम बुधाय नम:” या बुध मंत्राचा जप करा. जर तुमच्या कुंडलीमध्ये बुध आधीच पीडित असल्यास तुम्ही पन्ना रत्न धारण करा.
कन्या राशीच्या लोकांना या काळात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. यावेळी तुम्हाला कामावर, कुटुंबात आणि आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत आणि सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. घरात गोंधळ आणि तणाव वाढू शकतो. मानसिक अस्वस्थता आणि निद्रानाश ही समस्या असू शकते. या काळात कन्या राशीच्या लोकांनी बुधवारी गाईना हिरवा चारा देणे फायदेशीर ठरेल. तसेच तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. त्यासोबतच तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
कुंभ राशीच्या लोकांना या काळात सावधानता बाळगावी लागेल. भावनिक अस्थिरता, अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. योजनांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. भागीदारी आणि करार गुंतागुंतीचे होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, थकवा आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. या काळामध्ये बुधवारी सकाळी स्नान करा आणि हिरवे कपडे परिधान करा. भगवान विष्णूसमोर बसा आणि मंत्रांचा जप करा. शनिवारी काळे तीळ, लाल कपडे आणि लोखंडी वस्तू दान करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)