
फोटो सौजन्य- pinterest
2025 चे वर्ष संपण्यासाठी जवळपास 1 महिना बाकी आहे. त्याआधी, न्यायाचा ग्रह शनि आपला मार्ग बदलणार आहे. यावेळी तो 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीमधून आपला मार्ग बदलणार आहे. शनिचे हे संक्रमण 26 जुलै 2026 पर्यंत याच स्थितीत होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या हालचालीमुळे काही राशींच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तर काहींचे चालू काम विस्कळीत होऊ शकते. ज्यावेळी शनि संक्रमण करतो किंवा आपली युती बनवतो त्यावेळी तो त्याचा शुभ अशुभ परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. दरम्यान, शनिचा साडेसातीचा असलेला प्रभाव काही राशीच्या लोकांच्या कामामध्ये अनेक अडचणी आणतात. तर शनिच्या या हालचालीमुळे काही राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांना शनिच्या संक्रमणामुळे ताण वाढू शकतो. तुमचे कामही रखडू शकते. तुम्हाला तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात काळजी घ्यावी लागेल, अन्यथा लोक त्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात. सरकारी कामामध्ये या लोकांना त्रास होऊ शकतो. पैसे हुशारीने खर्च करा. व्यवसायात मंदी येऊ शकते. या काळात तुम्हाला विविध क्षेत्रात सहभागी होण्याची संधी मिळेल.
शनिच्या संक्रमणामुळे कुंभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमचे विरोधक अधिक सक्रिय होऊ शकतात. कोणतेही नवीन प्रकल्प सुरू करणे टाळा. परिस्थितीशी धीराने वागा. या काळात तुमच्या नात्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीकडून अनपेक्षित टिप्पण्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्थिर करू शकतात. कामाशी संबंधित समस्याच नाही तर मानसिक आणि शारीरिक थकवा देखील जाणवू शकतो. या काळात तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.
मीन राशीच्या लोकांसाठी शनिचे संक्रमण चांगले राहणार आहे. मात्र हा काळ तुमच्यासाठी आव्हानांनी भरलेला राहील. तुमच्या कुटुंबातील तणाव तुम्हाला चिडचिडे बनवू शकतात. गुंतवणुकीबाबत मानसिक ताण टाळा. आरोग्याच्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. तुम्हाला हंगामी आजारांपासून सुरक्षित राहावे लागेल. परीक्षा आणि स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळविण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. लग्नात अडथळे येऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मार्गी म्हणजे ग्रहाची सर्वसाधारण गती होय. ही गती जड गती न राहता सोपी आणि थेट चाल चालू राहते
Ans: 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीमधून आपला मार्ग बदलणार आहे. शनिचे हे संक्रमण 26 जुलै 2026 पर्यंत याच स्थितीत होणार आहे.
Ans: शनि मार्गीमुळे मेष रास, कुंभ रास आणि मीन राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल