फोटो सौजन्य- pinterest
आज 12 नोव्हेंबर बुधवारचा दिवस. आज चंद्र कर्क राशीतून सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अशा वेळी गजकेसरी आणि अनफा योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रात ज्यावेळी बुध दुसऱ्या घरामध्ये राहून वेशी योग तयार होईल आणि मालव्य राजयोग तयार होईल. शुक्र आणि सूर्याच्या युतीने शुक्रादित्य योग तयार होईल. आश्लेषा नक्षत्रामुळे शुक्ल योग तयार होणार आहे. शशि योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा, कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. न्यायालयाशी संदर्भात असलेली प्रकरणे मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढेल. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचा सहवास मिळेल.
कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस राहील. एखाद्या वरिष्ठ व्यक्तींकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. पाण्याची खरेदी करू शकता. गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन करू शकता. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता.
वृश्चिक राशीचे लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना विविध संधी मिळतील. लोखंड आणि धातूच्या संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांचा दिवस चांगला राहील. मालमत्तेच्या कामाच्या संदर्भात असलेली कामे आज पूर्ण होतील. कोणाला पैसे उधार दिले असल्यास ते परत मिळतील त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील.
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असेल तर तुम्हाला ते परत मिळू शकतात. तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. किराणा मालाशी संबंधित असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






