फोटो सौजन्य- pinterest
यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार, 22 सप्टेंबरपासून होत आहे आणि या उत्सवाची समाप्ती 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. या काळात वास्तूच्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे ते गरजेचे मानले जाते. यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि आनंद आणि समृद्धी येते. याशिवाय तुम्हाला शनिदेवाचे आशीर्वाद देखील मिळतात आणि तुमच्या होणाऱ्या त्रासापासून सुटका होते. शारदीय नवरात्रीमध्ये वास्तूच्या कोणत्या नियमांचे पालन करावे, जाणून घ्या
देवीच्या आगमनापूर्वी तुम्ही तुमचे घर आणि देव्हारा पूर्णपणे स्वच्छ करुन घ्यावा. तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. कारण वास्तूशास्त्रामध्ये या दिशेला शनिचे अधिराज्य मानले जाते. त्यासोबतच तुम्ही वास्तूच्या नियमांकडे देखील विशेष लक्ष द्यावे. घराच्या नैऋत्य कोपऱ्यात तुटलेल्या किंवा जड वस्तू ठेवणे टाळा. तुम्ही या ठिकाणी दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे देखील ठेवू शकता.
वास्तूशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विशेष महत्त्व दिले आहे. कारण घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे मुख्यद्वार नेहमी स्वच्ठ ठेवले पाहिजे. मुख्यप्रवेशद्वाराजवळ कचरा किंवा झाडू ठेवू नका. त्यासोबतच दरवाजाचा आवाज न होता दरवाजा उघडला जाईल याची काळजी घ्या. नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावू शकता. ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी येईल आणि घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाईल.
नवरात्रीच्या सुरुवातीला कलशाची प्रतिष्ठापना करा. जे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तूनुसार कलशाची स्थापना घराच्या ईशान्य दिशेला करावी. चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र पसरवून घ्या. त्यावर पाणी, सुपारी, नाणी, हळद आणि तांदूळ ठेवा त्यानंतर कलशावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा असे करणे पूजेसाठी खूप शुभ मानले जाते.
जर तुम्ही शाश्वत ज्योत पेटवत असाल तर वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार ती नेहमी आग्नेय दिशेला असायला हवी. नवरात्रीच्या काळामध्ये नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी संध्याकाळी घराच्या चारही कोपऱ्यात दिवे लावू शकता.
याशिवाय घरामध्ये ज्या वस्तू वापरामध्ये नाही आहेत अशा वस्तू नवरात्रीची सुरुवात होण्यापूर्वी घराबाहेर काढून टाका. कारण या वस्तूमुळे घरामधील नकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. नवरात्रीच्या काळामध्ये गरजूंना काळे तीळ, अन्न आणि उडीद डाळ यांचे दान करावे. त्यामुळे आपल्याला देवीसोबतच शनि देवाचा देखील आशीर्वाद मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)