फोटो सौजन्य- फेसबुक
हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या उत्सवांना विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात. या मराठी महिन्यांमध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना होय. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे.
हेदेखील वाचा- घराच्या कोणत्या दिशेला झाडू ठेवावा, जाणून घ्या वास्तू नियम
भगवान शंकरांना प्रिय असणारा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे? जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- खोलीत ठेवलेल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे वास्तुदोष होऊ शकतात ते जाणून घेऊया
यंदा कधी सुरु होतोय श्रावण
यंदा श्रावण महिना ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे. पंचांगानुसार, श्रावण शुक्ल प्रतिपदा म्हणजे 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरु होत आहे. तर 3 सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या तिथीला श्रावण महिना समाप्त होत आहे. यंदा श्रावण महिन्यात 5 श्रावणी सोमवार येत आहे.
श्रावण महिन्याचे महत्त्व
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणारी सोमवारचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जण उपवास करतात. कारण याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शितला सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी असे सण उत्सव आहेत. या सर्व सणांमुळे श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक वाढते.
यंदा किती श्रावणी सोमवार
श्रावण महिन्यात दरवर्षी 4 श्रावणी सोमवार येतात. परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात 5 श्रावणी सोमवार येत आहे. या काळात देशातील भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिगांना भाविक भेट देतात आणि महादेवाची मनोभावे पूजा करतात.
पहिला श्रावणी सोमवार – 5 ऑगस्ट
दुसरा श्रावणी सोमवार – 12 ऑगस्ट
तिसरा श्रावणी सोमवार – 19 ऑगस्ट
चौथा श्रावणी सोमवार – 26 ऑगस्ट
पाचवा श्रावणी सोमवार – 3 सप्टेंबर