फोटो सौजन्य- pinterest
आज गुरुवार 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. हिंदू धर्मामध्ये हा महिना खूप पवित्र मानला जातो आणि भक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाची उपासना करण्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण सुरू होताच मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा, मंत्रजप आणि विविध धार्मिक विधींची लगबग वाढते. श्रावण महिन्याचा पहिला गुरुवारचे विशेष महत्त्व आहे. श्रावणातील पहिल्या गुरुवारी कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
पंचांगानुसार, आज गुरुवार, 13 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आहे. श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. गुरुवार हा भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि गुरु तत्त्वाच्या उपासनेसाठी महत्त्वाचा दिवस मानला जात असल्याने श्रावणातील गुरुवाराला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त होते.
पंचांगानुसार आज, 13 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. आज बुध आणि सूर्य मिथुन राशीत बुधादित्य योग तयार करत आहेत, ज्यामुळे लाभ मिळेल. श्रावण महिना आणि गुरुवार यांचा संयोग धार्मिकदृष्ट्या शुभ मानला जातो. या दिवशी भगवान शिव, भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि गुरु तत्त्वाची आराधना करण्याची परंपरा आहे.
मेष राशींच्या लोकांसाठी आजचा गुरुवाचा दिवस उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे कौतुक होईल. उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मात्र, घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
कर्क राशींच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस चांगला राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकते. न्यायालयीन खटल्यांमध्ये तुम्हाला काहीसा दिलासा मिळू शकतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर अधिक चांगले लक्ष केंद्रित होईल. जोडीदाराकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल.
सिंह राशीच्या व्यक्तींना आज आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वगुणांचे कौतुक होऊ शकते. नवीन प्रोजेक्ट किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्ताराचा विचार करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक बाबतीत अचानक फायदा होऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधातही सकारात्मक बदल जाणवतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. त्यामुळे श्रावणातील गुरुवारही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
Ans: सूर्य आणि बुध एकाच राशीत किंवा भावात आल्यावर तयार होणाऱ्या योगाला ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग म्हटले जाते.
Ans: ज्योतिषीय मान्यतेनुसार काही राशींना आर्थिक संधी आणि व्यवसायात लाभ मिळू शकतो. मात्र प्रत्यक्ष आर्थिक निर्णय घेताना परिस्थितीचा स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक आहे.





