Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Margi 2026: १४ नोव्हेंबरपासून या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरी व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

Shukra Margi 2026: १४ नोव्हेंबरपासून ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या काळात नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 14, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • १४ नोव्हेंबरपासून ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा चार राशींवर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता
  • कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्यासोबत प्रगतीची संधी मिळू शकते
  • शुक्र मार्गीचा कोणत्या राशींना फायदा होणार
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह हा भौतिक सुख, संपत्ती, प्रेम, वैवाहिक जीवन आणि आर्थिक समृद्धी यांचे प्रतिनिधित्व करणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे, शुक्राच्या संक्रमणातील बदलांचा जीवनाच्या या सर्व पैलूंवर परिणाम होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी आपली वक्री अवस्था संपवून मार्गी होणार आहे. या बदलाचा काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे. या राशींना करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात नफा आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याच्या संधी मिळू शकतात.

धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी एखादा ग्रह वक्री अवस्थेतून मार्गी होतो, तेव्हा त्याच्याशी संबंधित जीवनाच्या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. शुक्राचा प्रभाव परिस्थिती बदलू शकतो, विशेषतः प्रेमसंबंध, वैवाहिक सुख, संपत्ती आणि भौतिक सुखसोयींशी संबंधित बाबींमध्ये. शुक्राच्या मार्गी गतीचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

शुक्र मार्गीचा या राशींना होणार फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांना शुक्र मार्गीचा फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला आर्थिक दिलासा मिळू शकतो. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय भागीदारीत असलेल्यांसाठी नफ्याच्या नवीन संधी निर्माण होतील. कुटुंबामध्ये सुखद वातावरण राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि संपत्ती जमा करण्याची क्षमताही बळकट होईल.

Chanakya Niti: पैसा कमावणे आणि वाचवणे दोन्ही महत्त्वाचे! जाणून घेऊया चाणक्य नीतीमधील नियम

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राची मार्गी गती फायदेशीर राहील. तुमच्या करिअर आणि आर्थिक जीवनात नवीन संधी निर्माण करू शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नतीची वाट पाहत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक संबंध व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबाच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करणे सोपे होऊ शकते.

तूळ रास

तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे त्याच्या गतीतील बदलांचा या राशींतील व्यक्तींसाठी महत्त्व आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी आपली कौशल्ये दाखवण्याची संधी मिळेल. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना एक चांगली संधी मिळू शकते. व्यवसायातील नफ्याची शक्यता वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.

Budh Transit: १३ नोव्हेंबरपासून बुध ग्रह होणार मार्गी, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता

कुंभ रास

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र मार्गी संक्रमणाचा काळ चांगला राहील. या काळात करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना एका मोठ्या करारामुळे लक्षणीय नफा मिळू शकतो.

उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्गही निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतून सकारात्मक परिणाम मिळण्याची अपेक्षा असते, परंतु सर्व बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. घाईघाईने घेतलेला आर्थिक निर्णय तोट्यास कारणीभूत ठरू शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: १४ नोव्हेंबरपासून कोणत्या राशींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत?

    Ans: ज्योतिषीय गणनेनुसार चार राशींच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरण्याची शक्यता आहे.

  • Que: १४ नोव्हेंबरपासून आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का?

    Ans: ज्योतिषीय मान्यतेनुसार काही राशींच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होऊ शकतात.

  • Que: शुक्र मार्गीचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: शुक्र मार्गीचा मेष, कन्या, तूळ आणि कुंभ राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Shukra margi 2026 people of these zodiac signs will get the expected success pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chhath Puja: रामायण आणि महाभारतातही आहे छठ पूजेचा उल्लेख? जाणून घ्या पौराणिक इतिहास
1

Chhath Puja: रामायण आणि महाभारतातही आहे छठ पूजेचा उल्लेख? जाणून घ्या पौराणिक इतिहास

Chanakya Niti: पैसा कमावणे आणि वाचवणे दोन्ही महत्त्वाचे! जाणून घेऊया चाणक्य नीतीमधील नियम
2

Chanakya Niti: पैसा कमावणे आणि वाचवणे दोन्ही महत्त्वाचे! जाणून घेऊया चाणक्य नीतीमधील नियम

Hingla Devi: मुंबईतील वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी! जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व
3

Hingla Devi: मुंबईतील वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी! जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

Kartiki Ekadashi 2026: कार्तिकी एकादशीला तयार अनेक शुभ योगायोग, या राशींच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश
4

Kartiki Ekadashi 2026: कार्तिकी एकादशीला तयार अनेक शुभ योगायोग, या राशींच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.