फोटो सौजन्य- pinterest
आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो तसाच आजचा शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. देवी लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते. तसेच शुक्रवारचा दिवस शुक्र ग्रहाशी देखील संबंधित आहे. त्यामुळे शुक्रवारी काही उपाय केल्यास व्यक्तीला पैशाची कमतरता कधीही भासत नाही. त्याच्या जीवनात येणाऱ्या अनेक समस्येपासून सुटका होते. या उपायामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा कायम आशीर्वाद राहतो. जाणून घ्या शुक्रवारी कोणते उपाय करायचे.
शुक्रवारच्या दिवशी पांधरी वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच एखाद्या गरीब गरजूवंताला शुक्रवारच्या तांदूळ दान करावे. यामुळे व्यक्तीला खूप पुण्य लाभते अशी मान्यता आहे. असे मानले जाते की, शुक्रवारी तांदूळ दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख शांती येते. तसेच त्या भक्तावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील राहतो. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता प्रवेश करते.
जर तुम्हाला वारंवार समस्या येत असल्यास तुम्ही शुक्रवारी हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल. आंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करावे आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. त्यानंतर लाल कापड्यामध्ये मूठभर तांदूळ आणि 5 किंवा 7 पिवळ्या कढई ठेवा. आता त्या एकत्रित करुन देव्हाऱ्यात ठेवा. शुक्रवारी हा उपाय करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या अडथळे आणि समस्या दूर होण्यास मदत होईल.
शुक्रवारी संध्याकाळी देवीची पूजा आणि आरती करुन झाल्यानंतर तांदूळ, केशर आणि गुलाबाची फुले लाल कपड्यामध्ये बांधा आणि ते देव्हाऱ्यात ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा झाल्यानंतर ते उचलून तिजोरीमध्ये ठेवा. त्यामुळे तुमची आर्थिर स्थिती स्थिर होईल आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.
जीवनातील नकारात्मकता दूर करुन घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी तुम्ही शुक्रवारी हा उपाय करणे फायदेशीर ठरेल. यासाठी तांदळाची खीर बनवून ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि विधीनुसार तिची पूजा करा. त्यासोबतच ‘ओम श्रीं महालक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा शक्य असल्यास 108 वेळा जप करा. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपा कुटुंबातील सदस्यांवर राहते, असे मानले जाते. हे उपाय केल्याने नोकरी आणि जीवनात यशाचे नवीन मार्ग उघडू लागतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)