
फोटो सौजन्य- pinterest
जर तुम्ही महादेवांचे भक्त असाल तर आणि शिवलिंगाची पूजा करत असाल तर घरामध्ये शिवलिंग ठेवणे का महत्त्वाचे आहे हे माहिती असणेदेखील गरजेचे आहे. यामुळे शुक्र आणि चंद्रदेखील बलवान होतो. घरामध्ये चांदीचे शिवलिंग आणल्याने जीवनात आनंद आणि शांती येते. चांदी हे शुक्र आणि चंद्राचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चांदीच्या शिवलिंगाला दोन शुभ ग्रहांच्या शक्तींचे प्रतीक मानले जाते. या शिवलिंगाची नियमितपणे पूजा केल्याने फक्त अध्यात्मिकच नाही तर मानसिक आरोग्य आणि आर्थिक शांती यासारखे सांसारिक फायदे देखील मिळतात. त्याचसोबतच घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक उर्जेने प्रवेश करण्यासाठी हे शिवलिंग घरात ठेवणे फायदेशीर मानले जाते. घरात चांदीचे शिवलिंग ठेवणे शुभ का मानले जाते, जाणून घ्या
शिवलिंगाची पूजा करताना चांदीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. ही पूजा केल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात असे देखील म्हटले जाते.
चांदी ही शुक्र आणि चंद्राचे प्रतीक आहे. यामुळे चांदीचे शिवलिंगाची पूजा केल्यास घरामध्ये धन आणि समृद्धी वाढेल. आर्थिक समस्या दूर होतात आणि सुख समृद्धी येते.
चांदीमध्ये मन शांत ठेवण्याचे अद्भुत गुणधर्म असतात. याची पूजा केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सद्भावना आणि प्रेम असते.
भक्तांच्या विश्वासानुसार चांदीच्या शिवलिंगावर नियमितपणे अभिषेक करणे आणि तीर्थयात्रेमध्ये सहभागी झाल्याने दीर्घकालीन आरोग्याच्या समस्येतून सुटका होते.
शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार काही व्यंग असलेल्या लोकांनी चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्याने त्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.
ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती कमकुवत आहे अशा लोकांना मानसिक तणाव, चिंता आणि झोपेच्या समस्या उद्भवतात. जर तुम्ही चांदीच्या शिवलिंगाची पूजा करत असाल तर तुमचे मन स्थिर राहील आणि चंद्र दोष दूर होईल.
जे जोडपे अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत अशा दाम्पत्यांनी प्रत्येक सोमवारी चांदीच्या शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते.
ज्या लोकांना कर्जाच्या समस्या आहेत आणि व्यवसायामध्ये ज्या लोकांना कायम समस्या येत असतील. समस्या दूर करणे आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी चांदीच्या शिवलिंगाची पूजा करू शकता.
ज्या लोकांना सतत अज्ञात गोष्टीबद्दल भीती किंवा चिंता असते अशा लोकांनी चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्याने प्रचंड तरी आणि मानसिक स्थिरता मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चांदी शुद्धता, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. शिवलिंग हे भगवान शिवांचे स्वरूप असल्याने चांदीचे शिवलिंग घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शुभत्व वाढते, अशी श्रद्धा आहे.
Ans: मनाला शांती मिळते, ध्यानात एकाग्रता वाढते आणि शिवकृपेने मानसिक तणाव कमी होतो.
Ans: शिवपूजेमुळे मानसिक शांती मिळाल्याने तणाव कमी होतो, ज्याचा अप्रत्यक्षपणे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.