सूर्य अर्घ्य
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत सूर्याच्या प्रवेशाला संक्रांती असे म्हटले जाते. आपल्याला केवळ जानेवारी महिन्यात मकर राशीत प्रवेश करत असलेल्या सूर्याची मकरसंक्रांत माहीत आहे. पण संक्रांती ही राशीच्या नावाने ओळखली जाते ज्यामध्ये सूर्य प्रवेश करतो.
संक्रांतीचा दिवस शास्त्रात खूप खास मानला जातो. 16 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करत आहे. अशा स्थितीत ती सिंह संक्रांत म्हणून ओळखली जाईल. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य सिंह राशीत आहे त्यांच्यासाठी ही संक्रांत भाग्यवान ठरू शकते. याबाबत अधिक माहिती दिली आहे गुरूजी सिद्धार्थ मणेरीकर यांनी (फोटो सौजन्य – Wikipedia/Facebook)
संक्रांत असते खास
ज्योतिष शास्त्रामध्ये संक्रांतीच्या दिवसात सूर्यदेवाची उपासना विशेष मानली जाते, ज्यांना भगवान सूर्याची कृपा मिळवायची आहे त्यांनी या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी असे सांगण्यात येते.. या दिवशी उपवास करणे आवश्यक आहे असेही ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. तसेच सूर्यदेवालाही अर्घ्य द्यावे असा नियम आहे.
हेदेखील वाचा – पहिल्यांदाच करताय मंगळागौरी व्रत, खाण्यात करा या पदार्थांचा समावेश मिळेल पुण्य
कसे द्याल सूर्याला अर्घ्य
सूर्याला अर्घ्य वाहण्याची पद्धत
हेदेखील वाचा – सिंह, कन्या, तूळ राशीच्या लोकांना श्रावणाच्या पहिल्या सोमवारी काल योगाचा लाभ
सिंह संक्रांतीच्या दिवशी हे उपाय करा
सिंह संक्रांतीच्या दिवशी उपवास करावा. यासोबतच सूर्यदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करावी. यासोबतच गूळ, लाल फुले, तांबे, गहू इत्यादी साहित्य दान करावे. तसंच सिंह संक्रांतीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करा. असे केल्याने भगवान सूर्य प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असा विश्वास आहे.
सिंह संक्रांतीसाठी पूजा मंत्र