फोटो सौजन्य- istock
दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्रवारी वरलक्ष्मी व्रत पाळले जाते. हे व्रत संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. वरलक्ष्मी व्रत हे हिंदू धर्मातील विवाहित महिलांनी पाळण्याचे एक विशेष व्रत आहे. धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत पाळले जाते. हे व्रत विशेषतः दक्षिण भारतात खूप लोकप्रिय आहे. हे व्रत घरात सुख-समृद्धी, दीर्घायुष्य आणि पतीचे उत्तम आरोग्य यासाठी शुभ आहे. ज्या महिलांना मूल होण्याची इच्छा आहे तेदेखील हे व्रत करू शकतात. ज्या घरात विवाहित स्त्रिया व्रत करतात त्या घरामध्ये सौभाग्य येते.
हेदेखील वाचा- सिंह संक्राती कधी आहे? जाणून घ्या महत्त्व, मंत्र
वरलक्ष्मी व्रत शुभ मुहूर्त
श्रावण महिन्यातील शुक्रवारी वरलक्ष्मीचा व्रत ठेवले जाते. यावेळी शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी वरलक्ष्मी व्रत पाळण्यात येणार आहे. वरलक्ष्मी व्रताची पूजा आरोहानुसार केली जाते, असे मानले जाते, तर प्रदोष काळातही मातेची पूजा करणे शुभ मानले जाते.
सिंह लग्न पूजा मुहूर्त– सकाळी 5 वाजून 57 मिनिटांपासून ते सकाळी 8.14 वाजेपर्यंत
वृश्चिक लग्न पूजा मुहूर्त– दुपारी 12:50 ते दुपारी 3:8
कुंभ लग्न पूजेचा मुहूर्त- संध्याकाळी 6:55 ते रात्री 8:22
वृषभ लग्न पूजा मुहूर्त – मध्यरात्रि – 11:22 ते 1:18
वरलक्ष्मी व्रत कसे साजरे केले जाते?
या दिवशी महिला सकाळी स्नान करून कलश बसवतात. आंब्याची पाने आणि फुलांनी कलश सजवला जातो. कलशाच्या समोर लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून तिची पूजा केली जाते. महिला दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी आरती करतात. संध्याकाळच्या आरतीनंतर उपवास मोडला जातो. महिला एकमेकांना भेटवस्तू देतात.
हेदेखील वाचा- पुत्रदा एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे दान करा, जाणून घ्या
वरलक्ष्मी व्रत पूजा विधी
वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठणे, आपली दिनचर्या पूर्ण करणे, घराची नीट साफसफाई करून आंघोळ करणे. आता घरातील मंदिर आणि पूजास्थान स्वच्छ करा आणि शुद्धीकरणासाठी त्या ठिकाणी गंगाजल शिंपडा. आता माता वरलक्ष्मीचे स्मरण करून व्रत ठेवण्याची प्रतिज्ञा घ्या. यानंतर एक लाकडी स्टूल घेऊन त्यावर स्वच्छ लाल रंगाचे कापड पसरून लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती किंवा मूर्तीची स्थापना करा. लक्ष्मीच्या मूर्तीजवळ थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा.
यानंतर गणेश आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा आणि सुगंधी उदबत्ती लावा. आता गणपतीला फुले, दुर्वा, नारळ, चंदन, हळद, कुमकुम, अक्षत आणि फुलांची माळ अर्पण करा. यानंतर देवी वरलक्ष्मीला कुमकुम, अक्षत आणि फुलांच्या माळासह सोळा अलंकार अर्पण करा. आता मिठाई अर्पण करा. यानंतर मंत्रांचा जप करावा. पूजेच्या वेळी वरलक्ष्मी व्रत कथेचा पाठ करा. आरती करून पूजेची सांगता करा आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करा.
वरलक्ष्मी व्रताचे महत्त्व
संपत्ती आणि समृद्धी
या व्रताचे पालन केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात धनसंपत्ती वाढते.
आनंद आणि शांती
असे मानले जाते की, हे व्रत केल्याने कुटुंबात सुख-शांती नांदते आणि घरातील वातावरण आनंदी राहते.
सौभाग्य प्राप्ती
विवाहित महिलांसाठी हे व्रत शुभ मानले जाते. हे व्रत पाळल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते.
मुलाच्या आनंदाची प्राप्ती
हे व्रत मुलांना निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी देखील पाळले जाते. अपत्य नसलेल्या विवाहित स्त्रियादेखील अपत्यप्राप्तीच्या इच्छेसाठी हे व्रत करतात.
गरिबी दूर होते
वरलक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनातून दारिद्र्य दूर होते आणि त्याच्या अनेक पिढ्याही दीर्घकाळ आनंदी जीवन जगतात.