
फोटो सौजन्य- pinterest
आज गुरुवार, 18 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि मासिक शिवरात्र देखील आहे. आज चंद्राचे संक्रमण दिवसरात्र वृश्चिक राशीमध्ये होणार आहे. आज चंद्र, शुक्र आणि बुध यांच्यामध्ये त्रिग्रह योग तयार होत आहे. चंद्र आणि बुध यांच्या युतीमुळे कलानिधी योग तयार होईल. मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे सुनफा योग तयार होईल. अनुराधा नक्षत्रामुळे अमृत सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योगदेखील तयार होत आहे. या सर्व शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमची विविध क्षेत्रात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महत्त्वाची संधी मिळू शकते. तुम्हाला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांचा प्रभाव आणि आदर वाढलेला राहील. तुमच्या सहकाऱ्यांकडूनही तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. व्यवसायामध्ये मोठा करार होऊ शकतो. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याची इच्छा असेल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. समाजामध्ये तुमचा प्रभाव वाढेल. तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल. यावेळी तुमचे आरोग्य अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळेल. तुम्ही नवीन कामाची सुरुवात देखील करु शकता.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. तुम्ही काहीतरी महत्त्वाचे साध्य करू शकता. तांत्रिक कामात गुंतलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांकडूनही पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकता. तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल.
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी काही समस्या किंवा ताण येत असल्यास ते दूर होतील. तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जर तुम्ही एखाद्याला मुलाखत दिली असल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळू शकते. तुमच्या मुलांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. व्यवसायातील उत्पन्नात वाढ होईल. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. एखाद्या नवीन प्रकल्पाची तुम्ही सुरुवात करु शकता. तुम्हाला कुठूनतरी अनपेक्षित नफा देखील मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या सहकाऱ्याकडून मिळालेली मदत तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)