
फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा राजा सूर्य डिसेंबरमध्ये आपले नक्षत्र बदलणार आहे. सूर्याला पितृत्व, सन्मान, प्रतिष्ठा, आत्मा आणि उर्जेचा कारक मानले जाते. सूर्याचे हे संक्रमण प्रत्येक राशीच्या लोकांवर परिणाम करणारे आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याचे नक्षत्र शुक्राच्या पूर्वाषाढा नक्षत्रात होणार आहे. सूर्याचा शुक्राच्या पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश केल्याने त्याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. सूर्याचा नक्षत्र बदल वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे 29 डिसेंबरमध्ये होणार आहे. सोमवार, 29 डिसेंबर रोजी सकाळी 6.37 वाजता सूर्य पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
हे संक्रमण ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जात आहे. सूर्य हा अधिकार, प्रतिष्ठा, नोकरी, सत्ताप्राप्ती, प्रगती, आरोग्य आणि आत्मविश्वासाचा प्रतिनिधी मानला जातो. त्याच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर शुभ होतो तर काही लोकांवर अशुभ होतो. त्यामुळे काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळघणे गरजेचे आहे.
वृषभ राशीतील सूर्याचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगती करणे सोपे होईल. करिअरमध्ये प्रगतीमुळे आर्थिक लाभ आणि उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. तुमचे प्रेम जीवन चांगले जाईल.
पूर्वाषाढा नक्षत्रात सूर्याच्या प्रवेशामुळे सिंह राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. यावेळी तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. सिंह राशीच्या लोकांची या काळात प्रलंबित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनात प्रेम फुलेल आणि आदर वाढेल. या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. सरकारी क्षेत्रातील काम पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळेल. तसेच तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात यश मिळेल.ॉ
सूर्याचे तूळ राशीत होणारे संक्रमण खूप शुभ असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना लाभ होतील. तुम्हाला आर्थिक लाभ आणि आनंदात वाढ होईल. व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकेल. तुमचे प्रेम जीवन अनुकूल राहील. तुमच्या नेतृत्व क्षमता वाढतील. या काळात तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. आरोग्यात सुधारणा होईल तेसच पितृसंपती संबंधित तुम्हाला फायदा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: सूर्य नक्षत्र संक्रमण 29 डिसेंबर रोजी करणार आहे
Ans: सूर्याचे नक्षत्र संक्रमण वृषभ, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे
Ans: सूर्याला पितृत्व, सन्मान, प्रतिष्ठा, आत्मा आणि उर्जेचा कारक मानले जाते.