फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहला दैत्य गुरु मानले जाते. याशिवाय या ग्रहाला धन वैभव, ऐश्वर्य, आनंद, प्रेम, लग्न यांसारख्या गोष्टींचा कारक मानला जातो. अशा वेळी कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती मजबूत असल्यास तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. यावेळी दैवी गुरु शुक्र मेष राशीमध्ये विराजमान आहे आणि जून अखेरपर्यंत या राशीत राहील. एखाद्या ग्रहाशी संयोग किंवा विशेष पैलू असेल ज्यामुळे शुभ अशुभ ग्रहांचा परिणाम जाणवेल. मंगळवार, 17 जून रोजी शुक्र आणि सूर्य एकमेंकापासून 45 अंशांवर आहेत त्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होत आहे. या योगामुळे तयार होणाऱ्या योगाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होऊ शकतो. ग्रहांचा राजा सूर्य यावेळी मिथुन राशीमध्ये विराजमान आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी
या राशीच्या लोकांना सूर्य आणि शुक्र योगाचा परिणाम अर्धकेंद्र योगामुळे फायदेशीर राहील. या राशीच्या लोकांचे खूप वेळेपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. याच्या मदतीने शत्रूंचा पराभव करता येतो. परदेश प्रवासाची शक्यता आहे. बाराव्या घरात सूर्य असल्याने न्यायालयीन प्रकरणांमध्येही यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना हा योग फायदेशीर राहील. आरोग्यासाठी हा योग सर्वोत्तम राहील. धार्मिक कार्यात तुम्ही रस घ्याल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
Vastu Tips: आरसा योग्य दिशेला ठेवल्यास तुमच्या घरात नांदेल सुख समृद्धी
सिंह राशीच्या लोकांना अर्धकेंद्र योगाचा लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. यासोबतच आर्थिक स्थितीही वेगाने सुधारत आहे. समाजात मान सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित लाभ मिळतील. तुमची प्रगती होईल आणि नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. व्यावसायिकांचे अडकलेले कामे व्यवस्थितरित्या सुरु होतील. या लोकांचा आदर आणि सन्मान वाढेल. तुमच्या जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवा.
सूर्य आणि शुक्र योग अर्धकेंद्र योगाचा कन्या राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या राशीमध्ये शनि दहाव्या घरात असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना नशिबाती साथ मिळेल त्यामुळे तुमची प्रगती होईल. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता. व्यवसायामध्ये नवीन योजना आखल्यास तुम्हाला त्यात लाभ होईल. दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. तसेच तुम्ही धार्मिक कार्याचे आयोजन करु शकता. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)