
फोटो सौजन्य - Social Media
युद्धिष्ठिर म्हणजे धर्माचे पालन करण्यात आदर्शच जणू! त्याच्या कडून चुका होतील अशा अपेक्षाच कुणी बाळगत नव्हता. पण युद्धिष्ठिराच्या हातून असे काही घडले आहे, जे ऐकून कदाचित त्या प्रतिमेबद्दल तुम्हालाही थोडा राग येईल. धर्मी असणारा युद्धिष्ठिर काही चित्रणात स्वार्थीही दिसून आला आहे. कदाचित त्याच्या भावना तशा नसतील पण त्याचे वागणे काही तसेच होते. याचे चित्रण स्वतः अर्जुनाने रागाच्या भरात केले होते. चला त्या चुका कोणत्या? पाहू.
द्यूत खेळणे. युद्धिष्ठिराने केलेली ही पहिली चूक जी निदर्शनास आली. द्युताला नकारही देऊ शकला असता पण त्याने तसे केले नाही. द्यूत खेळाला तो खेळला, त्यात सगळं गमावलंही. सगळं गमावूनही तो व्यक्ती शांत बसला नाही मग त्याने द्रौपदीला डाव म्हणून लावला. ही ती द्रौपदी, जी त्याची पत्नी तर होतीच पण तिला स्वयंवरात स्वतः अर्जुनाने जिंकून आणले होते, युद्धिष्ठिराने नव्हे. सगळं हरलं गेलं तेव्हा धृतराष्ट्राने दया खाऊन युद्धिष्ठिराला हरलेल्या सगळ्या वस्तू पुन्हा परत दिल्या पण युधिष्ठीर शांत राहिला नाही त्याने पुन्हा द्यूताचा डावात सहभाग घेतला आणि त्याच चुका पुन्हा केल्या.
वनवासात असताना गंधर्वांनी दुर्योधनाला पकडून नेले होते. तेव्हा युद्धिष्ठिराकडे आपल्या हक्काचे राज्य बळकवण्याची संधी होती पण तेव्हा त्याने अर्जुनाला गंधर्वांशीच युद्ध करायला पाठवले. त्यात पांडव फसले आणि टाळता येणारे महाभारत युद्ध घडले. दुर्योधनाला गंधर्वांच्या तावडीतून सोडवून युद्धिष्ठिराला काय फायदा झाला? हे स्वतः युधिष्ठिरालाच माहिती.
युद्धाच्या दरम्यान, भीम आणि अर्जुन विरुद्ध पक्षातील मोठमोठ्या महारथींना मारत सुटत होते. पण युद्धिष्ठिर पांडवांचा मोठा भ्राता आणि पांडव दलाचा राजा म्हणून मोठे पराक्रम गाजवणे त्याचा धर्म होता पण त्याने तसे काही केले नाही. तो युद्धातून पलायन करण्याचाच तयारीत दिसत होता. त्याने एकाही मोठ्या महारथीचा वध केला नाही. शेवटी, अठराव्या दिवशी म्हणजेच युद्धाच्या शेवटी स्वतः श्री कृष्णाने एका तरी महारथीचा वध करण्याचा सल्ला त्याला दिला तेव्हा कुठे युद्धिष्ठिराने शल्याचा वध केला आणि शल्यपर्व समाप्तीस आणले.
युद्धदरम्यान, युद्धिष्ठिरावर कर्ण याने आक्रमण केले त्यात तो जखमी झाला. श्री कृष्णाच्या सल्ल्याप्रमाणे अर्जुन जखमी अवस्थेत असलेल्या आपल्या मोठ्या भ्रात्याला पाहण्यासाठी शिबिरात आला तेव्हा युद्धिष्ठिर अर्जुनालाच नावे ठेऊ लागला. त्याला भित्रा म्हणू लागला आणि त्याच्या गांडीव धनुष्यालाही नावे ठेवू लागला. तेव्हा रागाच्या भरात अर्जुनाने युद्धिष्ठिरावर उचलण्यासाठी म्यानातून तलवारही बाहेर काढली होती, तेव्हा श्रीकृष्णामुळे युद्धिष्ठिर वाचला.
शेवटी, सगळं युद्ध संपून पांडव विजयी झाले तेव्हाही युद्धिष्ठिराने त्याच्या पराक्रमांना पूर्णविराम दिला नाही. आपल्या विजयासाठी पांडव सेनेतील अब्जो सैनिकांनी प्राणांची आहुती दिली. त्याचा काडीचाही विचार न करता युद्धिष्ठिराने जखमी दुर्योधनाला चॅलेंज दिले की आमच्या मधल्या तुझ्या इच्छेने कुणाही एकाशी गधा युद्ध कर, जर जिंकलास तर हस्तिनापूर राज्य तुझे! हे सगळं तेव्हा घडलं जेव्हा अब्जो सैनिकांनी, या युद्धिष्ठिराच्या राज्यासाठीच आपले प्राण गमावले. शेवटी युद्धाचे नियम तोडून भीमाने दुर्योधनाच्या पायावर गधा चालवली आणि पांडवांना हस्तिनापूर मिळाले.
पांडव जेव्हा स्वर्गाकडे सदेह मार्गस्थ होत होते. तेव्हा असा नियम पांडवांनी तयार केला होता की हिमालयाच्या वाटेने जाताना जो कुणी खाली पडेल, त्याला उचलण्यासाठी कुणीही मागे थांबणार नाही. जो पडला तो तिथेच सुटला, जो नाही पडला तो स्वर्गात सदेह पोहचणार. यावेळी युद्धिष्ठिर सोडून सगळे पांडव आणि द्रौपदी खाली पडले. तेव्हा युद्धिष्ठिराने सगळ्यांच्या बद्दल वाईट शब्द उद्गारले. सगळ्यांचा कमीपणा ऐकून दाखवला आणि शेवटी एकटाच सदेह कायमचा स्वर्गात गेला.
( Refrence : महाभारतातील १०८ रहस्य – समर )