प्रत्येक राशीचा त्याचा असा विशिष्ट असा स्वभाव असतो. राशीस्वामीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वागणूकीत काही खास गोष्टी असतात. ज्योतिष शास्त्रानुसार अशा काही राशी आहेत ज्या भगवान भोलेनाथांच्या प्रिय आहेत कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या.शांततेचं आणि संयमाचं रुप म्हणून महादेवांना पाहिलं जातं. बेलपत्र, जलाभिषेक केल्याने या महादेवांची कृपा प्राप्त होते म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार महादेवांचा कृपाशिर्वाद या पाच राशी लाभलेल्या आहेत. भोलेनाथ या पाच राशींच्या व्यक्तींवर कायमच प्रसन्न असतात.
या आहेत पाच राशी
मेष राशीचा स्वामी हा मंगळ आहे. ही माणसं प्रचंड धाडसी आणि योद्धा असतात. या राशीच्या मंडळीच्या धाडसी पराक्रमामुळे ही रास भोलेनाथांची प्रिय रास असल्याचं म्हटलं जातं. या राशीच्या माणसांना भोलेनाथांच्या आशीर्वादाने करियरमध्ये यश प्राप्त होते.
कर्कचा राशीचा राशीस्वामी हा चंद्र आहे. चंद्र हा महादेवांना अतिशय प्रिय आहे. या राशीची मंडळी चंद्रासारखी शांत असतात. या राशीची इष्टदेवता देखील महादेव आहेत. त्यामुळे महादेवांचा यांच्यावर विशेष वरदहस्त असतो. या राशीच्य़ा लोकांवर महादेव प्रसन्न होतात.
तूळ राशीचा राशी स्वामी शुक्र आहे. ही मंडळी अध्यात्निक स्वभावाची असतात.शुक्राच्या प्रभावाखाली असलेली ही मंडळी मोहक सावळ्या रंगाची आणि मध्यम बांध्य़ाची असतात. या मंडळींना कलासक्त आयुष्य जगायला जास्त आवडतं.तूळ रास न्यायप्रिय रास आहे. ही माणसं नम्र आणि प्रामाणिक असताता म्हणूनच कठिण काळात भोलेनाथ यांच्य़ा पाठीशी असतात. असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.
जीवनात धन आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी या प्रकारचे रत्न परिधान केल्याने प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश
मकर राशीचा राशी स्वामी शनिदेव आहेत. भगवान शंकर हे शनिदेवांचे गुरु आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांवर महादेवांचा आशीर्वाद कायम असतो. शनीदेवांची रास असल्या कारणाने या राशीची मंडळी नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. ही माणसं प्रचंड मेहनती असतात. त्यामुळे भोलेनाथ या राशीच्या मंडळींवर प्रसन्न होतात.
कुंभ राशीची माणसं न्यायप्रिय असतात. मकर राशीप्रमाणे या राशीचा राशीस्वामी देखील शनिदेव आहेत. ही माणसं कष्टाळू वृत्तीचे असतात. या राशीच्या लोकांवर महादेवांची कृपा कायमच असते. त्यामुळे ही रास देखील भोलेनाथांची प्रिय रास असल्याचं म्हटलं जातं.