Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trigrahi Yog 2026: नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी तयार होत आहे शुभ योग, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Trigrahi Yog 2026: शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या एक दिवस आधी तूळ राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग काही विशिष्ट राशींसाठी फायदेशीर मानला जातो. त्रिग्रही योगाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 07, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी तयार होणार त्रिग्रही योग
  • सूर्य, बुध आणि चंद्र एकत्र आल्याने तयार होतो हा योग
  • त्रिग्रही योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार
 

दिवाळीचा सण रविवार, ८ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. पण त्याच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी तूळ राशीत त्रिग्रही योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या युतीमुळे सूर्य, बुध आणि चंद्र एकत्र येणार आहे. सूर्य आणि बुध आधीपासूनच तूळ राशीत आहेत.

७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:१५ वाजता चंद्र कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश करेल. या तीन ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग काही विशिष्ट राशींसाठी विशेष फायदेशीर मानला जातो. त्रिग्रही योगाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे ते जाणून घ्या

या राशींच्या लोकांना होणार त्रिग्रही योगाचा फायदा

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांसाठी त्रिग्रही योग शुभ राहणार आहे. तुमच्या राशीमध्ये पाचव्या घरामध्ये हा योग तयार होणार असून तो तुमची बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि निर्णयक्षमता वाढवू शकतो. गुंतवणुकीच्या निर्णयांमध्ये विवेकबुद्धी बाळगल्यास भविष्यात चांगला नफा मिळू शकतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. सोशल मीडिया आणि सर्जनशील क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली जाऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

Lakshmi Narayan Rajyoga: धनत्रयोदशीच्या दिवशी तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

तूळ रास

तूळ राशीत त्रिग्रही योग तयार होणार असून या राशींच्या लोकांसाठी तो फायदेशीर राहणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडतील आणि तुमचा आत्मविश्वास दृढ होईल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्यांना दिवाळीनंतर पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसाय सुरू करण्याची योजना आखणारे अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. काही जण आपल्या जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करू शकतात.

धनु रास

धनु राशींच्या कुंडलीमध्ये अकराव्या घरात हा योग तयार होत आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यावसायिकांना त्यांच्या जुन्या योजनांमधून चांगले परिणाम दिसू शकतात. ज्यांना परदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. या काळात तुमचा उत्साह आणि कार्यक्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्हाला तुमची ध्येये साध्य करण्यास मदत होईल.

Diwali 2026: दिवाळीत लक्ष्मी-गणेशाची मूर्ती खरेदी करताना करू नका या चुका, जाणून घ्या महत्त्व आणि नियम

कुंभ रास

कुंभ राशीच्या नवव्या घरात त्रिग्रही योग तयार होत आहे. हे घर भाग्य, धर्म आणि उच्च शिक्षणाशी संबंधित मानले जाते. अज्ञात किंवा अनपेक्षित स्त्रोतांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दौरे फायदेशीर ठरू शकतात. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबतचे संबंध सुधारतील आणि घरात सुखद वातावरण राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: त्रिग्रही योग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा तीन ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा त्रिग्रही योग तयार होतो.

  • Que: त्रिग्रही योगामुळे कोणत्या राशींना आर्थिक लाभ होऊ शकतो?

    Ans: ज्योतिषीय मान्यतेनुसार, या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक संधी, नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत मिळू शकतात.

  • Que: त्रिग्रही योगाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे

    Ans: त्रिग्रही योगाचा फायदा मिथुन, तूूळ, धनु आणि कुंभ राशींच्या लोकांना होणार आहे

Web Title: Trigrahi yog people of these zodiac signs will benefit financially pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Jari Mari Mata Temple: वरळीच्या डोंगरावर वसलेले जागृत जरीमरी माता मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
1

Jari Mari Mata Temple: वरळीच्या डोंगरावर वसलेले जागृत जरीमरी माता मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Lakshmi Narayan Rajyoga: धनत्रयोदशीच्या दिवशी तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Lakshmi Narayan Rajyoga: धनत्रयोदशीच्या दिवशी तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: धनत्रयोदशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: धनत्रयोदशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Gahininath Maharaj: संत निवृत्तीनाथांचे गुरू गहिनीनाथ महाराज कोण होते? जाणून घ्या जन्म, कार्य आणि समाधीस्थळ
4

Gahininath Maharaj: संत निवृत्तीनाथांचे गुरू गहिनीनाथ महाराज कोण होते? जाणून घ्या जन्म, कार्य आणि समाधीस्थळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.