
फोटो सौजन्य- pinterest
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. या शुभ दिवशी घरोघरी भगवान शालिग्रामशी तुळशीचा विवाह साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी भक्ताला मुलीच्या लग्नासारखेच फायदे मिळतात. हा आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिक शुद्धतेचा सण आहे. यावर्षी तुळशी विवाहाचा सण रविवार, 2 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी शुक्र ग्रह आपली राशी बदलेल. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे आणि तुळशी विवाहाच्या शुभ दिवशी एक शुभ योगायोग घडून येत आहे. या शुभ योगाचा परिणाम 12 राशीच्या लोकांवर होताना दिसून येईल. या काळात काही राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ आणि कलात्मक कौशल्यांमध्ये सुधारणा होताना दिसून येईल. शुक्र ग्रहांच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. या काळामध्ये तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच तुम्ही वाहनाची खरेदी करु शकतात. कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. त्यासोबतच तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. परदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमची कला तुम्हाला ओळख मिळवून देईल. संगीतात गुंतलेल्यांना एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल.
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. लग्नाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. जर तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. कुटुंबाकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. नवीन लोक तुमच्या कामात सामील होतील. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास जाणवेल.
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. लोक तुमच्या शब्दांची आणि आकर्षणाची अधिक प्रशंसा करतील. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असेल तर ती या काळामध्ये दूर होईल. नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती तुमच्या करिअरला दिशा देईल. नवीन प्रकल्पात पैसे गुंतवल्याने तुम्हाला भविष्याचे नियोजन करण्यास मदत होऊ शकते. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)