फोटो सौजन्य- istock
घरातील मंदिरात लक्ष्मीची मूर्ती असलीच पाहिजे. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. लक्ष्मी सोबत काही देवतांच्या मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.
आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचे खूप महत्त्व आहे. आपण वास्तुशास्त्राची काळजी घेतली पाहिजे. वास्तूनुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असल्यास कुटुंबात सुख, समृद्धी, आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. तर घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागतो. घरातील मंदिरात लक्ष्मीची मूर्ती असलीच पाहिजे. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. लक्ष्मी सोबत काही देवतांच्या मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.
वास्तूनुसार घरातील मंदिरात गणपती आणि माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा. तसेच गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्तींसमोर दररोज दिवा लावावा. असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासणार नाही.
हेदेखील वाचा- शनि चालिसाचे पठण केल्याने मूलांक 8 असलेल्या लोकांचे चमकेल नशीब
वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेचा स्वामी कुबेर आहे. ज्याला संपत्तीची देवता म्हणून ओळखले जाते. तुम्ही लक्ष्मीसोबत भगवान कुबेरचीही मूर्ती ठेवू शकता.
घरच्या देव्हाऱ्यात देवी लक्ष्मीसोबत विष्णूची मूर्ती ठेवा. वास्तुशास्त्रानुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती देव्हाऱ्यात ठेवणे शुभ असते.
हेदेखील वाचा- या राशीच्या लोकांना लक्ष्मी योगाचा लाभ
लक्ष्मी मातेच्या पूजेने धन आणि समृद्धी मिळते. ज्या घरात ऐरावत हत्ती आहे त्या घरात लक्ष्मी देवीचे विशेष चित्र ठेवावे. ऐरावत हत्तीसोबत लक्ष्मीचे चित्र अतिशय शुभ मानले जाते. या चित्रात हत्तीने कलश आपल्या सोंडेत धरला असेल तर ते अधिक शुभ मानले जाते. हत्तीवर स्वार होणाऱ्या माता लक्ष्मीला गजलक्ष्मी म्हणतात. या स्वरूपाची पूजा केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. गजलक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती घरात ठेवल्याने समृद्धी, सुख, शांती, वैभव आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो.
गजलक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र घराच्या उत्तर-पूर्व कोपर्यात किंवा मंदिराच्या उजव्या बाजूला ठेवावे. घोड्यावर बसलेली लक्ष्मीची मूर्ती उत्तर दिशेला ठेवणे देखील शुभ मानले जाते. या दिशेला गजलक्ष्मीचे चित्र लावल्याने घरातील सदस्यांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि प्रगती होते.