फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये सकाळी ब्रम्हमुहूर्तावर उठणे फायदेशीर मानले जाते. सकाळी उठून ही कामे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन मानसिक शांती मिळते, असे म्हटले जाते. सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी कराव्यात, जाणून घ्या
भारतीय संस्कृतीनुसार आणि आयुर्वेदात उल्लेख केल्यानुसार सकाळी लवकर उठणे खूप फायदेशीर मानले जाते. असे म्हटले जाते की, सकाळी लवकर उठल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो. हा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेले असते. सकाळी उठल्यानंतर रोज काही गोष्टी केल्यास त्याचे आपल्याला अनेक फायदे होतात. तसेच अशा काही गोष्टी केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात, जाणून घ्या
सकाळी उठल्यानंतर हात जोडून पृथ्वीमातेला शुभ दिवसासाठी प्रार्थना करा. तसेच जमिनीवर पाऊल ठेवण्यापूर्वी पृथ्वीमातेचा आदर केल्याने शुभता राखली जाते. शास्त्रात उल्लेख केल्यानुसार, समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले। विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. असे शास्त्रात म्हटले गेले आहे.
सकाळी उठल्यानंतर शक्य असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यावे. असे केल्याने पोट स्वच्छ राहते. त्यासोबतच शरीरातील विषारी घटकही बाहेर पडण्यास मदत होते. जीवनामध्ये पाणी हे अत्यंत महत्त्वाचे घटक मानले जातात. जे शरीराला आतून आणि बाहेरुन स्वच्छ करण्यास मदत करते.
सकाळी आंघोळ झाल्यानंतर घरातील देव्हाऱ्यात तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच ओम नमः शिवाय किंवा गायत्री मंत्राचा जप करावा असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
सकाळी पूजा करुन झाल्यानंतर शंख किंवा घंटा वाजवल्याने घरामधील वातावरण अशुद्धता दूर होते. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले गेल्यास ध्वनी लहरी सूक्ष्म जीवाणू आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात.
सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर तुळशीभोवती प्रदक्षिणा घाला. असे केल्याने आपल्याला फायदे होतात. तसेच ऑक्सिजन पातळीत देखील वाढ होते. असे देखील मानले जाते की, तुळशीमध्ये देवत्व असते त्यामुळे सकाळी उठल्यावर हे उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार, सकाळी उठल्यानंतर नियमित या गोष्टी केल्यास तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच मानसिक शांती देखील मिळते. मात्र घरातील नकारात्मकता दूर करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)