शिरोळ येथील विद्यार्थ्यांचे अनोखे रक्षाबंधन; विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या पोहोचल्या लडाख, चंदीगढ सीमेवर
रक्षाबंधनाचा सण भाऊ बहिणींच्या नात्यात प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असणार आहे. दरवर्षी हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. हा दिवस बहिणींसाठी विशेष असतो. कारण त्या आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याला दीर्घायुष्य, आनंद, समृद्धी आणि संरक्षण मिळावे, यासाठी प्रार्थना करतात. त्यावेळी भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि त्यावेळी बहिणीला भेटवस्तू देखील देतो. यावेळी रक्षाबंधनाचा सण शनिवार, 9 ऑगस्ट रोजी सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी राखीशी संबंधित अनेक पारंपारिक आणि धार्मिक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहे. उदाहरणार्थ राखी बांधताना किती गाठी बांधाव्यात, राखी बांधताना कोणत्या दिशेला तोंड करावे? अशाच काही गोष्टीची उत्तरे आणि नियम आज आपण जाणून घेऊया.
राखी बांधण्यापूर्वी भावाने डोक्यावर रुमाल ठेवावे, ते शुभ मानले जाते.
तसेच प्लास्टिक किंवा तुटलेली राखी शुभ मानली जात नाही.
सोने, चांदी किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेल्या राख्या थेट बांधू नयेत.
राखी ही कापसाच्या किंवा पवित्र धाग्यापासून बनवलेली असावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्रथम कापसाची राखी बांधू शकता आणि नंतर सजावटीची राखी बांधू शकता.
राखी बांधण्यापूर्वी मुहूर्त बघून घ्यावा. तसेच भद्रा काळामध्ये राखी बांधू नये. कारण हा काळ खूप शुभ मानला जातो.
राखी बांधून झाल्यावर भावाने बहिणीच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा
भावाला राखी बांधताना तीन गाठी बांधणे खूप शुभ मानले जाते.
या तीन गाठीचा अर्थ त्रिदेव – ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांना समर्पित आहे.
प्रत्येक गाठीचा संबंध भावाच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते
तीन गाठी बांधल्याने भावा-बहिणीचे नाते अधिक मजबूत होते.
राखी बांधण्यामागे भावनिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे.
धर्मामध्ये दिशांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कोणतीही पूजा, शुभ कार्य करताना दिशेकडे लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे असते. योग्य दिशेने बसल्यास घरातील वातावरण सकारात्मक राहते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायच्या वेळी भावाचे तोंड पूर्व दिशेला असावे.
पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा मानली जाते. सूर्याला चैतन्य, नवीन सुरुवात आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. या दिवसाची सुरुवात वाढ, प्रकाश आणि आशा दर्शवते. ज्यावेळी भाऊ पूर्व दिशेकडे तोंड करुन बसतो त्यावेळी सूर्याची सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याबरोबरच बहिणीने राखी बांधल्याने त्याचे संरक्षण आणि कल्याणाचे व्रत आणखी शक्तिशाली बनते. धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख केल्यानुसार, पूर्व दिशेला तोंड करुन केलेली पूजा किंवा शुभ कार्य करणे अधिक फायदेशीर ठरते. राखी बांधतेवेळी या नियमांचे पालन करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)