फोटो सौजन्य- pinterest
आपल्या जीवनावर ग्रहांचा प्रभाव खूप खोलवर पडताना दिसून येतो. कधीकधी आपण खूप मेहनत घेऊनही आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. मन अस्थिर राहते किंवा व्यवसायात सतत समस्या अडथळे येत राहतात. अशा वेळी ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार बुध ग्रहाची स्थिती सुधारणे खूप महत्वाचे असू शकते. बुध ग्रहाला ज्ञान, बुद्धिमत्ता, त्वचेचे तेज, सामान्य ज्ञान आणि व्यवसायाशी संबंधित असल्याचे प्रतीक मानले जाते. ज्यावेळी कुंडलीमध्ये बुध ग्रह कमकुवत असतो त्यावेळी या सर्व क्षेत्रांमध्ये समस्या उद्भवतात. अशा वेळी वेलचीचा उपाय करणे प्रभावी ठरते. बुध ग्रहाला बळकटी देण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरतो.
वेलचीला बुध ग्रहाचे प्रतीक मानले जाते. बुध ग्रह आपल्या जीवनामध्ये संवाद, बुद्धिमत्ता, विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता असलेला त्याचबरोबर व्यवसायावर परिणाम करतो. जर बुध बलवान असेल तर व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेण्याची क्षमता चांगली होते आणि व्यवसायात प्रगती होते. ज्यावेळी बुध ग्रह कमकुवत होतो त्यावेळी मानसिक अस्वस्थता, चुकीचे निर्णय, व्यवसायात नुकसान आणि नातेसंबंधांमध्ये तणाव यासारख्या समस्या दिसू लागतात.
वेलचीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे तिचा वापर पूजेमध्ये देखील केला जातो. वेलचीमुळे आपल्या जीवनामध्ये असलेली नकारात्मकता दूर होण्यास देखील मदत करते.
बुध ग्रहाला बळकट करण्यासाठी असा करा उपाय
सर्वांत पहिले 100 ग्रॅम वेलची घ्यावी.
त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये दोन लीटर पाणी घ्यावे
त्या पाण्यामध्ये वेलची टाकून ती उकळून घ्यावी
ते पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर थंड करुन बाटलीमध्ये गाळून घ्या
नंतर दररोज आंघोळ करण्यापूर्वी तुमच्या बादलीतमध्ये वेलचीचे पाणी घालून त्याने आंघोळ करावी
असा उपाय सलग सात दिवस करावा. असे म्हटले जाते की, सात दिवसांत बुध ग्रह बलवान होऊ लागतो आणि जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतात.
वेलचीचा हा उपाय केल्याने मानसिक मानसिक शांती मिळेल आणि ताण कमी होईला लागतो.
त्याचसोबत आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते.
तसेच व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते.
या उपायामुळे त्वचेवर देखील परिणाम होताना दिसून येतो. वेलचीच्या या उपायाने खूप सोपा आणि सुरक्षित आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)