फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये पूजा आणि हवन दरम्यान दिवा लावला जातो. या दिव्याला शुभतेचे प्रतीक मानले जाते. दिव्याशिवाय कोणतीही पूजा करणे अपूर्ण मानले जाते. यावेळी लोक चांदीचा दिवा, मातीचा दिवा किंवा पिठाचा दिवा लावतात. दरम्यान मातीचे दिवे नेहमी जास्त वापरले जातात. घरात लावलेला दिवा अंधार आणि नकारात्मकता दूर करतो आणि सकारात्मकता आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करतो, असे देखील मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, दिवा लावण्याच्या दिशेकडे आणि नियमांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. दिव्याचे नियम योग्यरित्या पाळले गेल्यास सुख, शांती, सौभाग्य आणि लक्ष्मीने भरलेले असते. तसेच आर्थिक लाभ होऊ शकतो. वास्तूशास्त्रामध्ये दिवा लावण्याची योग्य दिशा कोणती, दिवा नेमका कोणत्या दिशेला ठेवावा ते जाणून घ्या
धार्मिक मान्यतेनुसार, घरात दिवा लावणे अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानले जाते. असे मानले जाते की, दिवा लावल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणि सुख-समृद्धी येते. तसेच वास्तशास्त्राच्या म्हणण्यानुसार, दिवा लावताना त्याच्या दिशेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा विपरित परिणामाला सामोरे जावे लागू शकते.
हिंदू धर्मामध्ये बऱ्याचदा शांत आणि आनंद कायम राखण्यासाठी घरामध्ये दिवा लावला जातो. मात्र शास्त्रात सांगितल्यानुसार घरात दिवा नेमका कोणत्या दिशेला लावावा, नियमितपणे दिवे लावल्याने घरात समृद्धी, संपत्ती आणि आनंद येतो का? दरम्यान, दिवा लावण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम आणि सर्वात अनुकूल आहे. तर धनाचा देव म्हणून कुबेराची दिशा ओळखली जाते. या दिशेला दिवा लावल्याने घरात कधीही धन आणि समृद्धीची कमतरता भासत नाही त्याबरोबरच कुटुंबावर कुबेराचा आशीर्वाद राहतो.
धार्मिक मान्यतेनुसार, घराच्या दक्षिण दिशेला जळणारा दिवा ठेवू नये. तर दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला दिवा लावल्याने घरामधील नकारात्मकता वाढू लागते. कुटुंबातील सदस्यांमध्ये मानसिक ताण आणि चिंता निर्माण होऊ शकते. याशिवाय दक्षिण दिशेला जळणारा दिवा ठेवल्याने धनहानी होऊ शकते आणि सुख-शांतीचा नाश होतो. तसेच व्यक्तीला कोणतेही शुभ फळ मिळत नाही.
शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे दिवा लावताना वास्तूच्या नियमांचे योग्य पालन करणे गरजेचे आहे. दिवा लावताना नेहमी त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा. घरातील देव्हाऱ्यामध्ये दिवा लावल्याने शुभ फळ मिळतात, असे म्हटले जाते. याशिवाय जळता दिव्याकडे कधीही दुर्लक्ष करु नये.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)