फोटो सौजन्य- pinterest
मोगरा फुलांचा सुंगध खूप मनमोहक असतो आणि तो दिसायलाही आकर्षक असतो. पण या मोगराचे रोप घरात लावण्याचे वास्तुशास्त्रासोबतच ज्योतिषीय देखील फायदे आहेत. जर मोगराचे रोप योग्य दिशेने लावल्यास त्याचे आपल्याला शुभ परिणाम मिळतात. असे म्हटले जाते की, मोगराचे रोप लावल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या दूर होतात. त्याचसोबत हे रोप लावताना वास्तूच्या नियमांचे पालन करणे देखील गरजेचे मानले जाते. मात्र ही वनस्पती चुकीच्या दिशेला लावली गेल्यास त्याचे अशुभ परिणाम मिळू शकतात. मोगराचे रोप घरात कोणत्या दिशेला लावायचे जाणून घ्या
पूजा करतेवेळी मोगराचा समावेश करण्याला विशेष महत्त्व आहे. भगवान शिव, विष्णूजी आणि माता लक्ष्मीच्या पूजेदरम्यान मोगरा फुलांचा वापर केल्यास खूप शुभ परिणाम मिळतात असे मानले जाते. यामुळे आजूबाजूचे वातावरणदेखील शुद्ध राहते. जर तुम्ही या वनस्पतीचा शुक्रवार आणि गुरुवारी पूजेमध्ये वापर केल्यास तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात, अशी श्रद्धा आहे. व्यक्तीच्या जीवनातील दुःख आणि समस्या नाहीशा होतात असे देखील म्हटले जाते.
मोगरा वनस्पती योग्य दिशेला लावणे महत्त्वाचे आहे. जर वास्तूच्या नियमांनुसार मोगरा लावल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते. मोगरा वनस्पती ईशान्य किंवा उत्तर दिशेने लावावी. तसेच पूर्वेकडेही मोगरा लावू शकतात. यामुळे आजूबाजूचे वातावरण शांत आणि आल्हाददायक बनते. मात्र हे रोप सूर्यप्रकाश आणि हवा मिळेल अशा ठिकाणी ठेवावे.
ही वनस्पती सुंदर, फुलांचा सुगंध मनमोहक असल्याने मनाला शांती मिळते. या वनस्पतीला घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीजवळ देखील ठेवू शकतो. मात्र या वनस्पतीला शौचालय किंवा बाथरूमजवळ कधीही ठेवू नये ते अशुभ मानले जाते. मान्यतेनुसार ती अशा ठिकाणी ठेवावी की तिथे पूर्णपणे उजेड येईल अंधार राहणार नाही. मोगरा वनस्पतीला कधीही सुकून देऊ नका सुकली असल्यास ती लगेच घरातून बाहेर काढा.
घरामध्ये मोगरा वनस्पती लावल्याने मानसिक ताण कमी होतो तसेच घरातील वातावरण शांत राहते. त्यासोबत घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते. ही वनस्पती आजूबाजूला ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. व्यक्तीला घरगुती त्रासांपासून मुक्त होण्यास मदत करते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)