फोटो सौजन्य- pinterest
बऱ्याच जणांना घरामध्ये वेगवेगळे प्राणी पाळण्यास आवडतात. काही जण घरामध्ये मांजर, कुत्रा पाळतात. पण घरात पोपट पाळणे शुभ की अशुभ काय सांगितले वास्तुशास्त्रात जाणून घ्या
हिंदू धर्मामध्ये निसर्गासोबत प्राण्यांनाही विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. बऱ्याच घरामध्ये प्राणी आणि पक्षी पाळण्याची आवड असते. कुत्रे, मांजरी, मासे, ससे आणि पोपट यांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, घरामध्ये पाळीव प्राळल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तसेच पोपटाला पिंजऱ्यामध्ये एकट्याला ठेवू नये तर त्यांची जोडी ठेवणे शुभ मानले जाते.
जर तुम्ही घरामध्ये पोपट पाळत असाल तर ती घरामध्ये उत्तर पूर्व दिशेला ठेवा. असे म्हटले जाते की, उत्तर दिशा ही बुध ग्रहाच्या संबंधित आहे. जी बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. जर पोपट घरामध्ये उत्तर दिशेला असल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये सकारात्मक परिणाम मिळतात. तर पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा मानली जात असल्याने घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते असे म्हटले जाते. तसेच या दोन्ही दिशेला कुबेर आणि देवी लक्ष्मींचा वास असतो, असे मानले जाते.
घराच्या उत्तर दिशेला पोपट ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होते. तसेच त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. पोपट घरात पाळल्याने दाम्पत्यांमधील नाते मजबूत राहते.
असे देखील म्हटले जाते की, घरात पोपट पाळल्याने घरातील लोक आजारी कमी पडतात आणि निराशेचे वातावरण राहत नाही.
जर तुम्ही पोपट पिंजऱ्यात ठेवला असाल तर लक्षात ठेवा की तो आनंदी राहील याची काळजी घेणे. असे म्हटले जाते की, पोपट आनंदी राहिला नसेल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करु शकते.
घरामध्ये पोपट पाळल्याने याचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होतो. मुलांचे मन तीक्ष्ण होते, त्यांच्यामधील एकाग्रता वाढण्यास मदत होते. मुलांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होते.
तुम्ही घरी पोपट पाळत असल्यास त्याच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यावी. शक्य झाल्यास त्याला हिरव्या रंगांचे पदार्थ खायला द्यावे. जर घरात पोपट पाळल्यास सुख समृद्धी येते आणि घरातील नकारात्मकता दूर होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)