फोटो सौजन्य- pinterest
घरात झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही झाडे घरातील वातावरण शुद्ध करतात. त्यामुळे आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता वाढते. त्यासोबतच तुळशी आणि शमीच्या झाडांना हिंदू परंपरेत खूप महत्त्व आहे. कारण तुळशीला देवीचे रुप मानले जाते. त्यामुळे घरात सुख, शांती आणि आर्थिक प्रगती होते. दरम्यान, शमी वनस्पती शनिदेवाशी संबंधित आहे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सौभाग्य वाढवते असे मानले जाते. तुळस आणि शमीची झाडे एकत्र लावणे शुभ की अशुभ ते जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार, तुळशी आणि शमीची झाडे योग्य दिशेने आणि ठिकाणी ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. यासोबतच कुटुंबामध्ये परस्पर प्रेम, सुसंवाद आणि मानसिक शांती वाढते. दरम्यान जर तुम्ही ते चुकीच्या दिशेने लावल्यास किंवा एकाच कुंडीत लावल्यास त्याचे उलट परिणाम होताना दिसू शकतात. तुळस आणि शमीची झाडं एकत्रित लावणे शुभ आहे की अशुभ जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार, तुळशी आणि शमीची झाडं घरामध्ये एकत्र लावता येते. मात्र ही दोन्ही रोपे वेगवेगळ्या कुंडलीमध्ये लावावीत. वेगवेगळ्या कुंड्यामध्ये लावल्याने त्यांची ऊर्जा स्वतंत्रपणे काम करते, जी घरात सकारात्मकता पसरवते. तुळशी आणि शमीची झाडे एकत्रितपणे लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील सुधारते.
परंपरेनुसार, एकाच कुंडीमध्ये तुळशी आणि शमीची झाडे लावणे अयोग्य मानले जाते. असे केल्याने आर्थिक अस्थिरता, पैशाचे नुकसान किंवा कर्ज होऊ शकते. धार्मिक श्रद्धा आणि वास्तु या दोन्हीनुसार, दोन्ही रोपे वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावावीत.
तुळशीचे रोप साधारणपणे पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते, तर शमीचे रोप नैऋत्य दिशेला ठेवल्यास चांगले परिणाम मिळतात. योग्य दिशेला लावणल्यास आणि व्यवस्थित काळजी घेतल्यास घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते आणि आरोग्य, समृद्धी, सौभाग्य यांमध्ये वाढ होते.
हिंदू धर्मात शमी वृक्षाला पवित्र मानले जाते. शनिच्या पूजेमध्ये त्याला विशेष महत्त्व आहे. नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि शनिदोषापासून मुक्तता देते. वास्तुशास्त्रामध्ये तुळशी आणि शमी दोघांचेही स्वरूप एकमेकांच्या विरुद्ध आहे. तुळसला सौम्यता, शांती आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तर शमीला गांभीर्य, तपस्या आणि शनीच्या शक्तीशी संबंधित मानले जाते. ही दोन्ही रोपे एकत्र ठेवल्याने त्यातील ऊर्जा एकत्र होतात. ज्यामुळे घरात असंतुलन आणि नकारात्मकता निर्माण होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)