फोटो सौजन्य- pinterest
आजकाल बऱ्याच लोकांकडे वाहन असतात. ती वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. म्हणजे दुचाकी, चारचाकी, रिक्षा मात्र हे पार्क करण्यासाठी योग्य दिशा माहीत असणे गरजेचे आहे अन्यथा वास्तूदोषाच्या समस्या उद्भवू शकतात. घरातील वास्तू ही नेहमी खूप महत्त्वाची मानली जाते. तुम्ही गाडी नेमकी कुठे पार्क करत आहात त्यावर वास्तू अवलंबून असते. तुम्ही घराच्या समोर किंवा मागे पार्क केली तर त्याचा परिणाम तुमच्या घरातील उर्जेवर, संपत्ती, प्रगती आणि शांतीवर होतो.
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा केवळ येण्या-जाण्याचा मार्ग मार्ग नसून यामधून सकारात्मक ऊर्जा देखील घरात प्रवेश करते. त्यामुळे तुम्ही गाडी घरासमोर उभी करत असल्यास सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यास अडथळा येऊ शकतो. याचा परिणाम म्हणून जीवनात अडथळे, पैशाचा अभाव आणि कौटुंबिक तणाव यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
ज्यावेळी आपण गाडी बाहेर उभी करतो त्यावेळी त्यात अनेक ऊर्जा जमा होतात. त्याचा आपल्या जीवनात नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही दररोज गाडी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभी केल्यास त्याचा परिणाम घरातील वातावरणावर देखील होऊ शकतो. त्याचप्रमाणे घरासमोर वाहन पार्क केल्याने मार्ग अरुंद होतो त्यामुळे कोणत्याही हालचाली करण्यात अडचणी येतात. त्यामुळे मानसिक असंतुलन देखील निर्माण होते.
घराच्या मुख्य गेटपासून थोड्या दूर अंतरावर पार्क करावी
पार्किंगची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी.
नेहमी गाडी झाकून ठेवावी आणि वेळोवेळी ती स्वच्छ धुवून घ्यावी
वाहनाचा पुढचा भाग घराकडे तोंड करून नसल्याची खात्री करा.
घराच्या पाठीमागे गाडी पार्क करणे योग्य की अयोग्य
मान्यतेनुसार घराचा मागचा भाग सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे मानले जाते. जर तुम्ही वाहन मागे किंवा बाजूला पार्क केले तर उर्जेचा प्रवाह घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे राहतो. यामुळे घरात आनंद, शांती आणि समृद्धी टिकून राहते.
मागच्या बाजूला गाडी पार्क केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. असेही मानले जाते की अशा व्यवस्थेमुळे घरात राहणाऱ्या लोकांचे मन शांत राहते आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता सुधारते.
गाडी पार्क करण्यासाठी वायव्य किंवा आग्नेय दिशेला गाडी पार्क करणे चांगले मानले जाते. या दिशा वेग आणि उर्जेशी संबंधित शुभ असल्याचे मानले जाते. मात्र ओपन टू स्काय कार पार्किंगसाठी पूर्व आणि उत्तर दिशा अधिक चांगल्या मानल्या जातात. त्याचप्रमाणे पार्किंगसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशेचा वापर मोठे वाहन पार्क करण्यासाठी केला जातो.
जर तुम्ही तुमच्या घराच्या मोकळ्या जागेत गाडी पार्क करत असाल तर उर्जेचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होईल. जर तुम्ही उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी फायबर किंवा धातूचे शेड बांधण्याचा विचार करत असाल, तर वास्तुनुसार फायबर शीटचा रंग निवडा. जर तुमचा व्हरांडा पूर्व दक्षिण दिशेला असल्यास तुम्ही त्या ठिकाणी रोप लावू शकता त्यामुळे आर्थिक लाभाच्या शक्यता वाढतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)