फोटो सौजन्य- pinterest
तुम्ही घरामध्ये चावी ठेवताना कधी दिशेकडे लक्ष दिले आहे का? बऱ्याचदा आपण चावी कुठेतरी ठेवून देतो. चावी हे फक्त दार उघडण्याचे साधन नाही तर घराच्या उर्जेशी आणि सौभाग्याशी देखील जोडलेली आहे.
वास्तुशास्त्रानुसार, चावी जर चुकीच्या दिशेला ठेवल्यास आर्थिक नुकसान, नकारात्मक ऊर्जा आणि कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता असते. अशावेळी घरात सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहायचा असेल तर चावी ठेवण्यासाठी नेमकी योग्या दिशा कोणती जाणून घ्या.
चाव्या नेहमी योग्य दिशेने ठेवल्या पाहिजेत. घराच्या चाव्या ठेवण्यासाठी पश्चिम दिशा सर्वांत शुभ दिशा मानली जाते. या दिशेला ठेवलेला चावीचा स्टँड किंवा बॉक्स सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राखतो.
तसेच दुकान आणि ऑफिसच्या चाव्या वायव्य दिशेला ठेवणे नेहमीच चांगले मानले जाते. तिजोरीची चावी नैऋत्य दिशेला ठेवावी. ही एक खूप चांगली दिशा मानली जाते, ती समृद्धी आणते.
स्वयंपाकघरात चावी ठेवल्यास घरात स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चावी अग्नी तत्वाच्या प्रभावाखाली येते आणि उर्जेचे असंतुलन करते.
देव्हाऱ्याजवळ कधीही चाव्या ठेवू नये. तिथे चाव्या ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहत नाही, असे म्हटले जाते.
बेडरुममध्ये देखील चाव्या ठेवू नये. बेडरूम ही विश्रांतीची जागा आहे. चाव्यासारख्या सक्रिय ऊर्जा असलेल्या वस्तू तिथे ठेवल्याने मानसिक ताण येऊ शकतो आणि झोपेत अडथळा येऊ शकतो.
लाकडाचा चावी स्टॅण्ड असणे शुभ मानला जातो. धातूऐवजी लाकडाचा वापर केल्याने ऊर्जा संतुलनात मदत होते.
चावीचा डबा सजवून ठेवा. विखुरलेल्या चाव्या गोंधळ आणि नकारात्मकता निर्माण करतात, म्हणून त्या एका व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवा. तुम्ही चावीच्या स्टँडवर कोणतेही शुभ चिन्ह जसे की ‘स्वस्तिक’ किंवा ‘ओम’ बनवू शकता. यामुळे ते ठिकाण आणखी सकारात्मक बनते.
घरात जुन्या, गंजलेल्या किंवा तुटलेल्या चाव्या ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घराची ऊर्जा कमकुवत होते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा चाव्या वेळीच काढून टाका.
दर शनिवारी चावीचा स्टँड स्वच्छ करा आणि त्यात कापूर किंवा लवंगाचा तुकडा ठेवा.
चावीवर एक छोटा पिवळा रिबन बांधल्याने शुभ फळे मिळतात.
आठवड्यातून एकदा तुळशीची पाने किंवा गोमूत्र ही स्टँडखाली शिंपडता येते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)