
फोटो सौजन्य- pinterest
2025 चे वर्ष अवघ्या काही दिवसांमध्ये संपणार आहे. सध्या नोव्हेंबर महिना सुरु आहे. 2026 चे वर्ष आणखी चांगले कसे करायचे यासाठी वास्तूमध्ये काही टिप्स सांगण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे वर्ष काही लोकांसाठी खूप चांगले असणार आहे तर ग्रहांच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. ज्यामुळे त्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. येत्या वर्षामध्ये काही समस्या टाळण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहे.
शास्त्रांमध्ये, गोमती चक्र हे भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार, घरांमध्ये गोमती चक्र असल्याने देवी लक्ष्मीचा कायम वास राहतो असे म्हटले जाते. हे संपत्ती, आरोग्य, आनंद आणि समृद्धी प्रदान करते आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करते. त्यामुळे घरामध्ये ऊर्जावान राहून पैशाच्या साठवणीमध्ये आणि तिजोरीत ठेवल्याने तुमच्या घरामध्ये समृद्धी येते.
फेंगशुईनुसार, लाल रिबनमध्ये बांधलेले तीन चिनी नाणी समृद्धी आणि आर्थिक प्रगतीचे प्रतीक मानले जातात. ही नाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लटकवल्याने नकारात्मक उर्जेचा प्रवेश थांबवला जातो आणि घरामधील सकारात्मक उर्जेचा प्रवाह लगेच वाढवला जातो.
दक्षिणावर्ती शंख हा समुद्रमंथनातून मिळणाऱ्या 14 रत्नांपैकी हा एक रत्न मानला जातो. हे खरेदी करुन मुहूर्तावर त्याची पूजा करणे, लाल कापडात गुंडाळणे आणि तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवणे यामुळे समृद्धीमध्ये अपेक्षित वाढ होते.
घरी किंवा कामाच्या ठिकाणी लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. असे म्हटले जाते की, हात वर केलेला असलेला लाफिंग बुद्धा प्रगतीचे प्रतीक मानले जाते. तर गठ्ठा घेऊन जाणारा बुद्ध आर्थिक समस्यांपासून मुक्तता देतो. अशी मूर्ती घरामध्ये ठेवणे किंवा दुकानाच्या ईशान्य दिशेला ठेवणे खूप शुभ मानले जाते.
तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तुमच्या घरात तुळशीचे रोप लावून त्याची भक्तिभावाने पूजा केल्याने धन, समृद्धी आणि यशाचा मार्ग मोकळा होतो. नवीन वर्षात मानसिक शांती आणि सकारात्मकता राखण्यासाठी घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)