फोटो सौजन्य - Social Media
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला राक्षसांचा गुरू मानले जाते. तसेच हा ग्रह सौंदर्य, विलास, प्रेम, आकर्षण, ऐश्वर्य आणि कला यांचा कारक आहे. शुक्र ग्रहाच्या हालचालींचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे पडतो. सध्या शुक्र मीन राशीत वक्री आहे आणि तो १३ एप्रिल २०२५ रोजी मीन राशीत मार्गी होणार आहे. शुक्राच्या मार्गी होताच काही राशींचे नशीब पालटणार असून त्यांना आर्थिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर मोठे फायदे मिळू शकतात. चला पाहूया कोणत्या राशींचा हा काळ असणार आहे शुभफलदायी.
शुक्र ग्रह वृषभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे शुक्राच्या मार्गी होण्याचा सर्वाधिक फायदा वृषभ राशीच्या लोकांना होणार आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता आहे. मुळात, यामुळे त्यांना आर्थिक लाभ होणार आहे. तसेच कामामध्ये यश मिळणार आहे. कौटुंबिक संबंध सुधारतील. नवीन ओळखी होतील तसेच नव्या लोकांशी मैत्री होईल. व्यवसायात नफा मिळेल.
धनू राशीच्या व्यक्तींना शुक्राचा हा बदल मोठे यश घेऊन येऊ शकतो. या काळात, रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीमध्ये प्रगती होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. कुटुंबातील तणाव कमी होईल आणि वाहन, जमीन किंवा प्रॉपर्टीचा लाभ होईल.
कुंभ राशीसाठी देखील शुक्राचा मार्गी होणं अत्यंत शुभ मानलं जात आहे. सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे नशिबाची साथ मिळेल. कामात यश मिळेल, पदोन्नतीची शक्यता आहे. पगार वाढीचा लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात, कुंभ राशीच्या व्यक्तीस मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारेल तसेच घर, गाडी खरेदी करण्याची संधी चालून येत आहे. या काळात शुक्र ग्रहाच्या शुभ परिणामांचा लाभ घेण्यासाठी आपण शांत चित्ताने निर्णय घ्यावेत. कामात सातत्य ठेवल्यास यश नक्कीच गवसेल. यासोबतच सुंदर वाणी आणि प्रेमळ वर्तन ठेवणं हे देखील शुक्राशी संबंधित आहे, त्यामुळे सामाजिक संबंधही सुधारतील. शुभ काळाचा योग्य उपयोग करून घ्या!