Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फाल्गुन महिन्यातील एकादशी कधी आहे? तुळशी संबंधित करा ‘हे’ उपाय

महिन्यातून दोनदा एकादशीचे व्रत केले जाते. ही तिथी भगवान विष्णूची आवडती तिथी मानली जाते. भगवान विष्णूलाही तुळशी अत्यंत प्रिय आहे. फाल्गुन महिन्यातील विजया एकादशी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी तुळशीचे हे उपाय करा

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 12, 2025 | 12:31 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूचे व्रत आणि उपासना केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असेही मानले जाते.

विजया एकादशी शुभ मुहूर्त

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी रविवार 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:55 वाजता सुरू होईल. ही तारीख 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 01:44 वाजता संपणार आहे. अशा स्थितीत सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी विजया एकादशी साजरी होणार आहे.

शुभ योग

पंचांगानुसार, 24 फेब्रुवारी 2025 रोजी, विजया एकादशीच्या दिवशी पूर्वाषाधा नक्षत्र तयार होत आहे जे संध्याकाळी 6:58 पर्यंत राहील. या तिथीला सिद्ध योग देखील तयार होत आहे, जो सकाळी 10:04 पर्यंत राहील.

रविदास जयंती कधी आहे? जाणून घ्या इतिहास, महत्त्व

विजया एकादशीचे महत्त्व

पद्म आणि स्कंद पुराणात विजया एकादशीचा उल्लेख आहे. असे मानले जाते की जेव्हा शत्रू आणि संकटांनी वेढलेले असते तेव्हा विजया एकादशीच्या उपवासाने विजय निश्चित केला जातो. पौराणिक कथेनुसार, रावणाशी युद्ध करण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी विजया एकादशीचे व्रत देखील केले होते.

भगवान विष्णूला कोणता नैवेद्य दाखवावा

भगवान विष्णूला प्रिय असल्यामुळे तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हणतात. अशा स्थितीत एकादशीच्या दिवशी पूजेदरम्यान भगवान विष्णूला अन्न अर्पण करताना त्यामध्ये तुळशीदळ अवश्य समाविष्ट करा. कारण भगवान श्रीहरींचा नैवेद्य तुळशीशिवाय अपूर्ण आहे, असे मानले जाते.

अशी पूजा करा

विजया एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे. आता तुळशीला लाल चुनरी अर्पण करा आणि तिच्यासमोर देशी तुपाचा दिवा लावा. असे केल्याने व्यक्तीला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात. यासोबतच भगवान विष्णू आणि देवी तुळशीचा आशीर्वादही प्राप्त होतो.

महाशिवरात्रीला अद्भुत योगायोग, 60 वर्षांनंतर तयार होणार त्रिग्रही युती योग

ही एक गोष्ट करा

सुख-समृद्धीसाठी एकादशीच्या दिवशी तुम्ही विशेष उपाय करू शकता. यासाठी विजया एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला कलव बांधू शकता. यातून तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतात. यासोबतच सर्व प्रकारच्या समस्याही हळूहळू दूर होऊ लागतात.

तुळशीजींचे मंत्र

महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते।।

तुलसी गायत्री

ओम तुलसीदेवाय च विद्महे, विष्णुप्रियायै च धीमही, तन्नो वृंदा प्रचोदयात्.

तुलसी स्तुती मंत्र

देवी त्वं निर्मिता पूर्वमर्चितासि मुनीश्वरैः
नमो नमस्ते तुलसी पापं हर हरिप्रिये।।
तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Vijaya ekadashi 2025 shubh muhurat tulsi related remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Puja Tips: देवघरातील घंटा कोणत्या धातूची असावी? जाणून घ्या घंटानादाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
1

Puja Tips: देवघरातील घंटा कोणत्या धातूची असावी? जाणून घ्या घंटानादाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Dream Astrology: स्वप्नात खाण्याशी संबंधित गोष्टी दिसण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत
2

Dream Astrology: स्वप्नात खाण्याशी संबंधित गोष्टी दिसण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत

Ashadha Purnima 2026: आषाढ पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा उपाय, येईल सुख समृद्धी
3

Ashadha Purnima 2026: आषाढ पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा उपाय, येईल सुख समृद्धी

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.