
फोटो सौजन्य- pinterest
असे म्हटले जाते की, जर तुम्ही विवाह पंचमीच्या दिवशी राशीनुसार राम आणि सीतेला काही वस्तू अर्पण केल्या तर त्यांना शाश्वत फळे मिळतात. शिवाय, विवाहाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात. विवाह पंचमीच्या दिवशी रामसीतेला राशीनुसार कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी लाल रंगाच्या कपडे अर्पण करावे यामुळे जीवनात ऊर्जा आणि आनंद येतो.
वृषभ राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला पांढऱ्या रंगांची फुले अर्पण करावीत. यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते.
मिथुन राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला कोणत्याही धातूपासून बनवलेल्या बांगड्या अर्पण कराव्यात. यामुळे नात्यात गोडवा येतो.
कर्क राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला केशर मिसळलेली खीर अर्पण करावी. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते.
सिंह राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला लाल चुनरी अर्पण करावी. यामुळे यश आणि शक्ती मिळते, अशी मान्यता आहे.
कन्या राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला हिरव्या बांगड्या अर्पण कराव्यात. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहते.
तूळ राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला पैंजण अर्पण करावे. असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते
वृश्चिक राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला सिंदूर अर्पण करावे. श्रद्धेनुसार असे केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
धनु राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला बेसनाचे लाडू अर्पण करावे. यामुळे जोडीदाराची पूर्ण साथ मिळते.
मकर राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला शमीची पाने अर्पण करावी. यामुळे जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात.
कुंभ राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला तिळाचे लाडू अर्पण करावे. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि सुख समृद्धी लाभते.
मीन राशीच्या लोकांनी विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला पिवळ्या रंगांचे कपडे अर्पण करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: विवाह पंचमी 25 नोव्हेंबर रोजी आहे
Ans: मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला राम आणि सीतेचा विवाह झाला होता. हा दिवस विवाह पंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राम सीतेची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते
Ans: राम सीतेला अर्पण म्हणून हळदीकुंकू, फूल आणि मिठाई अर्पण करावी