
फोटो सौजन्य- pinterest
विवाह पंचमी हा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी साजरा केला जातो. त्रेतायुगात याच दिवशी भगवान रामांनी माता सीतेशी लग्न केले होते. ज्यावेळी भगवान रामाने मिथिला येथे शिवाचे धनुष्य तोडले तेव्हा माता सीतेने त्यांच्या गळ्यात माळ घातली. त्यानंतर अयोध्येहून लग्नाची मिरवणूक आली आणि दोघांचा विवाह मोठ्या आनंदात पार पडला.विवाह पंचमी हा राम आणि सीता यांचा विवाहसोहळा म्हणून साजरा केला जातो. यावर्षी विवाहपंचमी रवि योगात साजरी केली जाणार आहे. जाणून घ्या विवाह पंचमी कधी आहे, पूजेसाठी काय आहे मुहूर्त आणि रवी योग कधी आहे.
पंचांगानुसार, विवाह पंचमी मार्गशीर्ष शुक्ल पंचमी तिथीची सुरुवात सोमवार, 24 नोव्हेंबर रोजी रात्री 9.22 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 25 नोव्हेंबर रोजी रात्री 10.56 वाजता होणार आहे. यावेळी विवाह पंचमी मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी आहे.
तसेच विवाह पंचमीच्या दिवशी रवी योग देखील तयार होत आहे. त्या दिवशी रवी योग रात्री 11.57 वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.53 वाजेपर्यंत राहील. रवि योग सर्व प्रकारचे दोष दूर करतो कारण त्यावर सूर्याचे वर्चस्व असते. विवाहपंचमीला रवि योगाव्यतिरिक्त, गंड योग सकाळपासून दुपारी 12:50 पर्यंत असणार आहे, त्यानंतर वृद्धी योग तयार होईल. उत्तराषाध नक्षत्र पंचमीला सकाळपासून रात्री 11.57 पर्यंत राहील, त्यानंतर श्रावण नक्षत्र सुरू होईल.
विवाह पंचमीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त सकाळी 5.4 ते 5.58 पर्यंत असणार आहे. तर अभिजित मुहूर्त सकाळी 11.47 ते दुपारी 12.29 पर्यंत असणार आहे. निशिता मुहूर्त रात्री 11.42 ते दुपारी 12.35 पर्यंत असणार आहे.
या वर्षी विवाहपंचमीला राहुकाल दुपारी 2.46 ते 4.5 वाजेपर्यंत असणार आहे. यमगंड योग सकाळी 9:30 ते 10:49 पर्यंत आहे. राहुकाळात कोणतेही शुभ कार्य करता येत नाही.
विवाह पंचमीला लोक लग्न करत नाहीत. मान्यतेनुसार, राम आणि सीतेच्या लग्नानंतर लगेचच, रामाला 14 वर्षांसाठी वनवासात पाठवण्यात आले. राम, सीता आणि लक्ष्मण 14 वर्षे जंगलात राहिले. सीतेच्या अपहरणामुळे रावणाच्या मृत्युचा मार्ग मोकळा झाला. अशोक वाटिकेत सीतेला रावणाचे अत्याचार सहन करावे लागले. राम राजा झाल्यानंतर सीतेने वियोग सहन केला आणि ती वनातच राहिली, जिथे लव आणि कुशचा जन्म झाला. या घटनांमुळे, लोक विवाह पंचमीला लग्न टाळतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: विवाह पंचमी मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी आहे.
Ans: विवाह पंचमी रवी योगात साजरी केली जाणार आहे
Ans: विवाहपंचमीला राहुकाल दुपारी 2.46 ते 4.5 वाजेपर्यंत असणार आहे. यमगंड योग सकाळी 9:30 ते 10:49 पर्यंत आहे. राहुकाळात कोणतेही शुभ कार्य करता येत नाही.