फोटो सौजन्य- pinterest
फेंगशुई आणि वास्तुशास्त्रात घरात कासव पाळण्याबद्दल महत्त्वाचे नियम सांगण्यात आलेले आहे. बऱ्याचदा सुख समृद्धीसाठी घरामध्ये असे कासव आणले जातात. फेंगशुईनुसार, घरात कासव पाळल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांवर सकारात्मक परिणाम होतो. शिवाय, तुमच्या ऑफिसमध्ये कासव पाळणे देखील शुभ मानले जाते. यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. दरम्यान घरी किंवा ऑफिसमध्ये कासव पाळण्यापूर्वी काही नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चुकीच्या ठिकाणी किंवा दिशेने कासव ठेवल्यास व्यक्तीच्या जीवनावर त्याचे नकारात्मक परिणाम होतात. घरामध्ये कासव पाळण्यापूर्वी वास्तूशास्त्र आणि फेंगशुईचे काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. काय आहेत ते नियम जाणून घ्या
फेंगशुईनुसार, कासवाला योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने ठेवणे खूप महत्त्वाचे मानले जाते. हिंदू धर्मामध्ये कासवाला सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूंनी कासवाचे रुप धारण केले होते. शिवाय, कासवाला शांत प्राणी मानले जाते. त्याची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवू शकता. याव्यतिरिक्त, पाण्याने भरलेल्या पितळेच्या किंवा अष्टधातुच्या भांड्यात कासवाची छोटी मूर्ती ठेवावी. घरी किंवा देव्हाऱ्यात कासव ठेवणे खूप फायदेशीर असते असे मानले जाते.
बऱ्याचदा आपण घरामध्ये कासवासाठी जागा निवडतो. फेंगशुई आणि वास्तुमध्ये कासव ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगितली गेली आहे. असे मानले जाते की उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा आहे. अशा वेळी कासवाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवणे खूप चांगले असल्याचे मानले जाते. यामुळे धनाची देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद देखील मिळतो आणि तुमचा बँक बॅलन्स वाढेल.असे मानले जाते की कासव उत्तर दिशेला ठेवल्याने शत्रूंचा नाश होतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते.
जर तुम्हाला तुमच्या करिअर, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सतत अडथळे आणि समस्या येत असल्यास घरामध्ये पितळी कासव आणून ठेवावे. यामुळे कामामध्ये येणारे अडथळे कमी होतात. तसेच तुम्हाला अपेक्षित यश मिळते. विद्यार्थ्यांसाठी देखील पितळी कासव खूप फायदेशीर आहे. घरात पितळेचे कासव ठेवल्याने आजूबाजूचे वातावरण नेहमीच सकारात्मक राहते.
जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल कासव ठेवू शकता. मान्यतेनुसार क्रिस्टल कासवामुळे घरामध्ये संपत्ती येते. यामुळे आर्थिक अडचणींपासून सुटका होते आणि संपत्तीमध्ये देखील वाढ होते. त्याचप्रमाणे घराच्या किंवा ऑफिसच्या मुख्य प्रवेशद्वारावर कासवाचा फोटो देखील लावू शकता. व्यवसायामध्ये प्रगतीचे नवीन संधी मिळतात आणि नोकरीतही यश मिळू शकते.
फेंगशुईनुसार, तुमच्या घरात कासव पाळल्याने नशिबाची साथ मिळते. दरम्यान, जर तुमच्या घरात अनेकदा किरकोळ वाद किंवा तणाव निर्माण होत असल्यास तर तुम्ही ही छोटीशी गोष्ट करू शकता. तुमच्या घरात एक किंवा दोन कासव आणा. असे केल्याने नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मकता वाढेल. यामुळे तुमची घरगुती त्रासातून सुटका होईल. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम राहील. घरात शांती, आनंद आणि आल्हाददायक वातावरण राखण्यासाठी, कासवांची जोडी पाळणे सर्वोत्तम मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: वास्तुशास्त्रानुसार कासव धनस्थैर्य, दीर्घायुष्य, सकारात्मक ऊर्जा आणि घर व्यवसायात स्थिरता आणते
Ans: उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला कासव ठेवणे शुभ असते
Ans: कासवाचे तोंड घराच्या आतल्या बाजूला असावे






