फोटो सौजन्य- pinterest
आजपासून जुलै महिन्याचा नवीन आणि शेवटचा आठवड्याची (28 जुलै ते 3 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विनायक चतुर्थीचटे व्रत पाळले जाणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जुलै रोजी नागपंचमी आहे. त्याचसोबत ग्रहाच्या हालचालीनुसार ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचा मानला जातो. करिअर, व्यवसाय, नोकरीनिमित्त मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी (28 जुलै ते 3 ऑगस्ट) कसा राहील, ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा खूपच धावपळीचा असू शकतो. यावेळी तुमची कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी वाद घालणे टाळावे. व्यवसायाशी संबंधित असणाऱ्यांसाठी हा आठवडा शुभ राहील. आर्थिक व्यवहारात सावधगिरीने करावे. विद्यार्थ्यांना या आठवड्यात काही मोठे बदल होऊ शकतात.
वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा फायदेशीर राहणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमची नियोजित काम वेळेवर पूर्ण होतील. व्यावसायिकांना लाभ होईल. नोकरी करणारे लोक कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील. तुमची एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीची भेट होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा उत्साहाने भरलेला राहील. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही मोठी जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. वसायात जलद प्रगती होईल, परंतु जास्त कामाच्या ताणामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा कायम राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा आरामदायी राहील. कुटुंबाच्या काही चिंतांबद्दल चिंतेत असाल तर या आठवड्यात ते दूर होईल. आरोग्य सामान्य राहील. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला या आठवड्यामध्ये फायदा होऊ शकतो. तुमची महत्त्वाची कामे या आठवड्यात पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला तुमच्या मुलांबद्दलही काळजी वाटेल. व्यावसायिकांनी कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावा. शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावे .
कन्या राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा मिश्रित राहील. या आठवड्यात तुमच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा थोडा प्रतिकूल असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात तुमच्या प्रयत्नांचे अनपेक्षित फायदे मिळतील. कुटुंबाशी संबंधित समस्या तुमच्यासाठी चिंतेचे कारण राहतील.
तूळ राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमच्या करिअर आणि व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचीही मदत आणि पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचा फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा मागच्या आठवड्यापेक्षा अधिक चांगला राहील. व्यवसायामध्ये अनुकूल परिस्थिती राहील. तुमची नियोजित कामे पूर्ण करण्यात अडथळे येऊ शकतात. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी मानसिक चिंता आणि तणावाने भरलेला असू शकतो. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या लोकांना नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल.
धनु राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा धावपळीचा राहील. या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. ज्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले राहाल.
मकर राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा चांगला राहील. तुमच्या सर्व समस्या दूर होतील. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या आठवड्यात फायदा होऊ शकतो. तुम्हाला पैसे गुंतवण्याची संधी मिळू शकते.
कुंभ राशींच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा फायदेशीर राहणार आहे. व्यवसाय मध्ये संबंधित कामांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य राहील. जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यावर थोडा तणाव राहील. आठवडे तुमच्या अडकलेले पैसे परत मिळतील.
मीन राशींच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सामान्य राहील. करियर व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायात अनुकूलता राहील. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)