फोटो सौजन्य- pinterest
ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीनुसार जुलै महिन्याचा दुसरा आठवडा (7 ते 13 जुलै) खास राहणार आहे. काही राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. नात्यांमध्ये असलेले अंतर दूर होईल. काही लोकांना संघर्ष करावा लागू शकतो. या आठवड्यामध्ये चंद्र बुध ग्रहाची हालचाल आणि शनिची दृष्टी काही राशीच्या लोकांवर विशेष परिणाम करु शकेल. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी कसा असेल, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा धावपळीचा राहील. तसेच करिअर आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. व्यवसायामध्ये महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. धार्मिक-आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत खास असणार आहे. कामामध्ये तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा समृद्धीने भरलेला राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळू शकतो. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा खूप फलदायी ठरणार आहे. विद्यार्थ्यासाठी हा आठवडा फायदेशीर राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा हा आठवडा अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित स्वरुपाचा राहील. या लोकांनी खूप सावधगिरी बाळगावी. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे. व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा प्रतिकूल राहील. स्पर्धकांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. या आठवड्यात तुमची काम वेळेवर पूर्ण होतील. करिअर व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. करिअरच्या दृष्टीने तुमचा हा आठवडा खूप शुभ राहणार आहे. सरकारी कामातील अडचणी दूर होतील. इमारत, वाहन इत्यादी खरेदीसाठी परिस्थिती अनुकूल राहील.
कन्या राशच्या लोकांचा हा आठवडा विशेष राहील. या लोकांना कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही सर्व अडथळ्यांवर मात कराल. नातेसंबंधांचा आदर करावा. मित्रांकडून जास्त अपेक्षा करू नका, कारण जर तुम्हाला या काळात त्यांच्याकडून वेळेवर मदत मिळाली नाही तर तुम्ही निराश होऊ शकता. पैशाच्या व्यवहारात खूप काळजी घ्या.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक राहील. प्रत्येक कामात अपेक्षित यश आणि नफा मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता असेल. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. कर्मचाऱ्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगला समन्वय राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्वाधिक खर्चिक राहील. तुम्हाला अचानक काही मोठे खर्च सहन करावे लागू शकतात. तुमच्या कामामध्ये सकारात्मकता राहील. कोणाकडूनही उधार घेतलेले पैसे परत मिळतील. तुमचे कर्ज वेळेवर फेडण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांसाठी हा आठवडा शुभ राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनेक समस्यांनी भरलेला राहील. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चिंता किंवा समस्या दूर होतील. व्यवसायात नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास विशेष फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कर्ज, आजार इत्यादींपासून मुक्तता मिळू शकते. व्यवसायात वाढ होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढेल.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. तुमच्या असलेल्या अडचणी संपतील. आर्थिक व्यवहार करताना खूप काळजी घ्या. घरात आणि बाहेर लोकांशी वाद घालणे टाळा. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा टाळा. बोलताना खूप काळजी घ्यावी लागेल.
कुंभ राशीच्या लोकांच्या या आठवड्यामध्ये नशिबाची साथ मिळेल. या आठवड्यात नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. मालमत्तेशी संबंधित वाद परस्पर संवादाने सोडवले जातील. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आधी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो. निष्ठांकडून सहकार्य आणि पाठिंब्यात घट होऊ शकते. व्यवसायात गुंतलेले असाल तर तुम्ही तुमची बचत केलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवली तरच तुम्हाला नफा मिळू शकेल. नातेसंबंधांत असलेले मतभेद दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)