durga ashtami (फोटो सौजन्य-pinterest)
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि अष्टमी तिथीला दुर्गा अष्टमी किंवा अष्टमी असते. दुर्गा अष्टमीचा दिवस विशेष असतो कारण या दिवशी कन्या पूजा केली जाते आणि काही ठिकाणी या दिवशी हवन देखील केली जाते. दुर्गाष्टमी कधी आहे? दुर्गाष्टमीचा मुहूर्त काय आहे आणि महागौरी पूजेचा मंत्र,भोग आणि महत्व काय आहे. जाणून घेऊयात
२०० वर्ष जुन्या माँ कालीच्या मंदिरात भक्तांची लाट, नवरात्री मध्ये दर्शन घेतल्यास पूर्ण होते मनोकामना
चैत्र नवरात्री सुरु आहे. माता राणीचे भक्त उपवास आणि उपासनेद्वारे माँ दुर्गेचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. नवरात्रीचे प्रत्येक दिवस महत्वाचे आहे आणि त्यात दुर्गा अष्टमीचा दिवस विशेष आहे. कारण या दिवशी कन्या पूजा केली जाते आणि काही ठिकाणी या दिवशी हवनही केली जाते. दुर्गा अष्टमी किंवा महाअष्टमी ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला येते. यावेळी दुर्गा अष्टमीलाही भद्रा आहे.
दुर्गा अष्टमीची तारिक काय
वैदिक कॅलेंडरनुसार, यावेळी चैत्र शुक्ल अष्टमी तिथी शुक्रवार, ४ एप्रिल रोजी रात्री ८:१२ वाजता सुरू होत आहे. ही तारीख शनिवार, ५ एप्रिल रोजी संध्याकाळी ७:२६ वाजता संपेल. उदयतिथीनुसार 5 एप्रिलला दुर्गा अष्टमी आहे. त्या दिवशी उपवास आणि कन्या पूजा असते.
मुहूर्त
दुर्गा अष्टमीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 04:35 पासून ते पहाटे 05:21 पर्यंत आहे. त्या दिवशी शुभ मुहूर्त किंवा अभिजीत मुहूर्त सकाळी ११:५९ ते दुपारी १२:४९ पर्यंत आहे. दुर्गा अष्टमीला पुनर्वसु नक्षत्र हे दुसऱ्या दिवशी ६ एप्रिल रोजी पहाटेपासून ते पहाटे ५:३२ पर्यंत आहे. त्यानंतर पुष्य नक्षत्र आहे.
दुर्गा अष्टमीला २ शुभ योग
यावर्षी दुर्गाअष्टमीला दोन शुभ योग्य बनत आहे. एक सुकर्मा योग्य आणि दुसरा रवि योग्य. दुर्गा अष्टमीची तिथीला सुकर्मा योग्य रात्री ८ वाजून ३ मिनिटाला बनतो. तेच रवी योग्य ६ एप्रिलला सकाळी ५ वाजून ३२ मिनिट ते ६ वाजून ५ मिनिट पर्यंत आहे. रवि योगमध्ये सगळ्या प्रकारचे दोष मिटतात.
दुर्गा अष्टमीला भद्रा असेल
दुर्गा अष्टमीच्या दिवशी सकाळी भद्रा देखील असते. ही भद्रा स्वर्गात राहते. भद्रा सकाळी ०६:०७ ते ०७:४४ पर्यंत असते. स्वर्गातील भाद्राचा नकारात्मक प्रभाव पृथ्वीवर लागू होत नाही.
महागौरी पूजन दुर्गा अष्टमीला करा
नवरात्रीच्या आठव्या दिवशी, दुर्गेचे आठवे रूप, महागौरीची पूजा केली जाते. महागौरीचे वाहन बैल आहे. तिच्या हातात त्रिशूळ आहे आणि ती गोरे रंगाचे कपडे घालते. भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हजारो वर्षे कठोर तपस्या केली, ज्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन, भगवान शिवाने तिला गोरा रंग दिला आणि ती देवी महागौरी म्हणून प्रसिद्ध झाली.
दुर्गा अष्टमी पूजा मंत्र
दुर्गा अष्टमीला पूजेचा मंत्र “ओम देवी महागोरियाय नमः” आहे.
देवी महागौरीचा नैवेद्य
दुर्गा अष्टमीला देवी महागौरीला प्रसन्न करण्यासाठी लोक पुरी, हलवा, काळे चणे, खीर, नारळ किंवा नारळापासून बनवलेल्या मिठाई अर्पण करतात.
दुर्गा अष्टमीचे महत्त्व
दुर्गा अष्टमीला, देवी महागौरीच्या आशीर्वादाने भक्तांचे दुःख आणि वेदना दूर होतात. भक्तांचे वय, सुख आणि समृद्धी वाढते.
अकाली मृत्यू म्हणजे काय? आत्म्याचा पुनर्जन्म किती दिवसांनी होतो? गरुड पुराणात काय लिहलं आहे?