Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार आठवड्यातले काही दिवस बांगड्या खरेदीसाठी खूप चांगले असतात.
सोमवार – हा दिवस महादेवाचा दिवस आहे. या दिवशी श्रृंगाराचं सामान घेणं चांगलं मानतात. त्यामुळे सोमवारी चुडा घेतला तर संसार चांगला होतो असं म्हणतात.
बुधवार – बुधवार हा नवीन वस्तू घेण्यासाठी चांगला दिवस समजला जातो. या दिवशी तुम्ही बांगड्या घेतल्या तर त्या जास्त दिवस टिकतात असं पण बोललं जातं.
गुरुवार – गुरुवारी भगवान विष्णूची पूजा होते. हा दिवस कोणतंही शुभ काम करायला चांगला असतो. त्यामुळे नवीन चुडा घ्यायचा असेल तर गुरुवारी घेऊ शकता.
शुक्रवार – शुक्रवार म्हणजे लक्ष्मीचा दिवस. पैसा, सौभाग्य आणि आनंदाशी संबंध असलेल्या वस्तू या दिवशी घेणं खूपच शुभ मानलं जातं. म्हणून शुक्रवारी बांगड्या घेणं सगळ्यात उत्तम.
जसे काही दिवस चांगले आहेत तसेच दोन दिवस टाळायला सांगितले आहेत. मंगळवार आणि शनिवार या दिवशी नवीन चुडा किंवा बांगड्या घेऊ नयेत. या दिवशी सौभाग्याच्या वस्तू घेणं टाळावं असं जुन्या जाणत्या बायका सांगतात. त्यामुळे तुम्ही खरेदी करणार असाल तर हे दोन दिवस सोडूनच करा.
बांगड्या घालण्याची पण एक पद्धत आहे. दोन्ही हातात सारख्या संख्येत बांगड्या कधीच घालू नयेत असं म्हणतात. म्हणजे दोन्ही हातात ४-४ किंवा ६-६ असं घालू नये.डाव्या हातात नेहमी एकाआड एक म्हणजे ३, ५, ७, ९, ११ अशा विषम संख्येत बांगड्या घालाव्यात. डाव्या हातात विषम संख्या शुभ मानली जाते.तर उजव्या हातात मात्र जोडीच्या संख्येत म्हणजे २, ४, ६, ८, १०, १२ अशा सम संख्येत चुडा घालावा. असं केल्याने घरात संतुलन राहतं असं मानलं जातं.
Shukra Gochar: शुक्र स्वराशीत होणार गोचर, चमकणार ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब; कोणाला मिळणार लाभ
बाजारात तर अनेक रंगाच्या बांगड्या मिळतात, पण सगळ्या रंग शुभ नसतात. सुहागासाठी काचेच्या बांगड्यांना जास्त मान आहे.
लाल रंग – लाल रंग प्रेमाचा आणि सौभाग्याचा रंग आहे. त्यामुळे लाल चुडा सगळ्यात जास्त घातला जातो.
हिरवा रंग – हिरवा रंग आनंद आणि हिरवळ दर्शवतो. लग्नानंतर हिरव्या बांगड्या घातल्या की घरात सुख राहतं असं म्हणतात.
पिवळा रंग – पिवळा रंग शुभ कार्याचा रंग आहे.नवीन लग्न झालेल्या मुलींनी सुरुवातीच्या काळात काळ्या रंगाच्या किंवा खूप जास्त गडद रंगाच्या बांगड्या घालू नयेत असं सांगितलं जातं.
शक्यतो लाल, हिरवा, पिवळा हेच रंग घालावेत.या सगळ्या गोष्टी जुन्या परंपरेतून आल्या आहेत. कोणाला पटेल कोणाला नाही, पण आपल्या आई-आजीने हे नियम पाळले आहेत. श्रद्धा असेल तर एकदा पाळून बघायला काय हरकत आहे. शेवटी हात भरून बांगड्या घातल्या की मनाला पण एक वेगळाच आनंद मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






