दिवाळी सणाला सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. घरात साफसफाई करून अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. याशिवाय घरात गोड आणि फराळातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. दिवाळीनिमित्त सगळीकडे नवीन कपडे, सुंदर साड्या, आणि ज्वेलरीसोबत बांगड्यांची सुद्धा खरेदी केली जाते. नवीन कपड्यांवर मॅच होईल असे दागिने सुद्धा विकत घेतले जातात. पारंपरिक लुकमध्ये भर घालण्यासाठी तुम्ही सुंदर सुंदर डिझाईनच्या मीनाकारी बांगड्या खरेदी करू शकता. मीनाकारी बांगड्यांमध्ये अनेक सुंदर सुंदर डिझाईन बाजारात उपलब्ध आहेत.(फोटो सौजन्य: Pinterest)
दिवाळीनिमित्त खरेदी करा सुंदर आणि आकर्षक डिझाईनच्या मीनाकारी बांगड्या!
मीनाकारी बांगड्या दिसायला मोठ्या वाटतात तरीसुद्धा वजनाने अतिशय हलक्या असतात. या बांगड्या हातात परिधान केल्यानंतर रॉयल आणि स्टयलिश लुक दिसतो.
मीनाकारी बांगड्या बनवताना आकर्षक रंगसंगती, गुंतागुंतीची कलाकुसर आणि शाही लुक दिला जातो. या बांगड्या तुम्ही कोणत्याही साडी किंवा लेहेंग्यावर परिधान करू शकता.
लाल, हिरवा, निळा, पिवळा यांसारख्या गडद आणि तेजस्वी रंगाच्या डिझाईन उपलब्ध आहेत. दिवाळीच्या रोषणाईत हातांमधील मीनाकारी बांगड्या अतिशय सुंदर दिसतील.
मीनाकरी बांगड्यांमध्ये सोन्याचे पॉलिश, अँटीक फिनिश किंवा कुंदन इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या तुम्ही खरेदी करू शकता.
हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही या डिझाईनच्या हेवी वर्क असलेल्या बांगड्या खरेदी करू शकता. या बांगड्या हातांची शोभा वाढतील आणि स्टयलिश, रॉयल लुक दिसेल.